...तर कोरोनापुर्वी उपसणारीने मरण्याची वेळ येईल; तरूण संगीतकाराने व्यक्त केली भावना

स्वप्नील भालेराव, सकाळ वृत्तसेवा- यिनबझ
Friday, 14 August 2020

अनिल हा शिक्षणात अतिशय हुशार... घरची आर्थिक परिस्थिती बेताची... बारावीनंतर डीएड् करण्याचा निर्णय घेतला... डीएड् करून शिक्षक होईल आणि काबाडकष्ट करणार्‍या आई- वडिलांना सुखाचे दोन घास भरवीन, या उद्देशाने उच्च शिक्षण न घेता आनिलने डीएड् करण्याचा मार्ग पत्करला... यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात आनिलचा डी.एड्ला नंबर लागला... मुलाच्या शिक्षणसाठी वडिलाने सावकराकडून व्याजाने कर्ज काढले आणि अनिलचे शिक्षण पुर्ण केले. आई- वडील काम करुन सावकाराचे पैसे फेडत होते. दुसरीकडे अनिल कठोर मेहनत घेऊन अभ्यासक करत होता...

नांदेड : 'एक तरी कला असुदे अंगी, नाही तरी फुका जन्मलाशी' असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. जीवन जगण्यासाठी व्यक्तीकडे एक तरी कला असावी अंगी असे तुकडोजी महाराजांनी आपल्या अभंगात सांगितले आहे. मात्र वास्तवामध्ये अनेक कला अंगी असूनही लोकडाऊनमुळे तरुणांवर उपासमारीची वेळ आली. आदिवासी किनवट तालुक्यातील लोणी (झेडींगुडा) गावचा तरुण अनिल चांदू दर्शनवाड (वय ३०) उत्तम प्रकारे कॅशीओ, ढोल, ताशा, मृदूंग वाजवतो. पंचक्रोशी त्याला संगीतमास्टर म्हणून ओळखतात. लग्न समारंभ, सारखपुडा, सन, उत्सव अशा विविध प्रसंगी अनिलला आवर्जून वाजवण्याचे निमंत्रन दिले जाते. यंदा लॉकडाऊनमुळे विवाह समारंभ, साखरपुडा, सन, उत्सव धुमधाम पद्धतीने साजरा करण्यास आणि बॅंड पार्टी लावण्यास सरकारने बंदी घातली. त्यामुळे यावर्षी एकाही लग्नाची सुपारी मिळाली नाही. यंदाच संपुर्ण सिजन हातच गेल्यामुळे कुटुंबावर बेरोजगारिची वेळ आली.

अनिल हा शिक्षणात अतिशय हुशार मुलगा. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे बारावीनंतर डीएड् करण्याचा निर्णय घेतला. डीएड् करून शिक्षक होईल आणि काबाडकष्ट करणार्‍या आई- वडिलांना सुखाचे दोन घास भरवीन, या उद्देशाने उच्च शिक्षण न घेता अनिलने डीएड् करण्याचा मार्ग पत्करला. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात अनिलचा डी.एड्ला नंबर लागला. मुलाच्या शिक्षणसाठी वडिलाने सावकराकडून व्याजाने कर्ज काढले आणि अनिलचे शिक्षण पुर्ण केले. आई- वडिल कष्ट करुन सावकाराचे पैसे फेडत होते. दुसरीकडे अनिल कठोर मेहनत घेऊन अभ्यास करत होता. बारावीमध्ये ७२ टक्के मार्क मिळून उच्च श्रेणीत पास झाला. त्यानंतर दोन वर्ष डीएड्चा अभ्यासक्रम पूर्ण करुन 75 टक्के मार्क मिळवले आणि गुवत्तेत उत्तीर्ण झाला. डी. एड् नंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी येेेथे 6 महिने येथे इंटर्नशिप केली. त्यानंतर नोकरीचा शोध सुरू झाला. एका खाजगी शिक्षण संस्थेवर दोन हजार रुपये महिन्याने तरुणाने नोकरी केली. कायम होण्यासाठी लाखाने पैसे द्यावे लागतात ही बाब तरुणाच्या लक्षात आली, त्यामुळे खाजगी नोकरी करण्याचा नाद सोडून दिला आणि शासकीय नोकरीच्या मागे प्रयत्न सुरू केले.

डी. एड पुर्ण झाल्यानंतर शासनाने सीईटी परीक्षा बंद केली आणि टीईटी सुरू केली. टीईटी देऊनही नोकरी मिळाली नाही. शेवटी घरच्या परिस्थितीचा विचार करून अनिलने एस. के. एस मायक्रो फायनान्स कंपनीत नोकरी पत्करली. खाजगी कंपनीत मानसिक सुरु झाला त्या त्रासला कंटाळून तरुणाने पदाचा राजीनामा दिला. घरचा पारंपारिक व्यवसाय वाजवण्याचा असल्यामुळे संगीताचे गुण जन्मात अवगत होते. त्यामुळे वडिलांच्या व्यवसायाला हातभार लावायस सुरुवात केली. त्यानंतर स्वतः काही लग्न, समारंभ वाजवले त्यामुळे उत्पन्नाला सुरुवात झाली. कुटुंबाचा आर्थिक गाडा पटलीवर येऊ लागला. आता आपला मुलगा कामाला लागला आहे म्हणून वडिलांनी लग्न लावून दिले. दोन वर्षांपूर्वी अनिलचे लग्न साध्या पद्धतीने झाले. संसाराची जबाबदारी खांद्यावर पडल्यामुळे वडीलांचा बालाजी ब्रंड पार्टी वाढण्याचा निर्णय घेतला.

यंदा आणखी धुमधडाक्यात लग्न वाजवायचे हा निश्चय करून वाजवण्याचे साहित्ये खरेदी केले. दरवर्षी उन्हाळ्याच्या सीझनमध्ये दोन ते आडीच लाख रुपये उत्पन्न मिळत होते. त्यामुळे यंदाही उत्पन्न निघाल्यानंतर विकत घेतलेल्या साहित्याचे पैसे परत करता येईल या उद्देशाने नवीन सामान खरेदी केले. मात्र यंदा केंद्र सरकारने अचानक लॉकडाऊन जाहीर केले आणि सण, समारंभ विशिष्ट अंतर पळून केले जावे असा नियम जाहीर केला. त्यामुळे अनिलला यंदा एकाही लग्नांची सुपारी मिळाली नाही. या वर्षी साधारण तिन लाख रुपयाचे नुकसान झाले. उदरनिर्वाहाचं दुसर कोणतही साधन नसल्यामुळे एकीकडे कर्जाचा डोंगर वाढत आहे तर दुसरीकडे सरकारने वाजवण्याची बंदी उठवली नसल्यामुळे उपासमारीची वेळ कुटुंबावर आली आहे. सरकारने गणपती उत्सवात वाजवण्याची परवाणगी दिली नाही तर उरलेला सीझन सुद्धा जाईल त्यामुळे 'हातचं भी लेग आणि दारच भी लेग हाती आल धुपाटण' अशी परिस्थिती निर्माण होईल, अशी चिंता अनिलने यिनबझकडे व्यक्त केली.

दरवर्षी दोन ते आडीच लाख रुपयांचा व्यवसाय उन्हाळ्यामध्ये होतो आणि गणपती उत्सवात साधारण एक लाख उत्पन्न मिळते यामध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि बालाजी बँड पार्टी मध्ये असलेल्या दहा कारागिरांना रोजगार मिळतो. मात्र यंदा सरकारने लॉकडाऊन काळात वाजवण्यावर बंदी घातली, त्यामुळे कुटुंब आणि वाजत्रीवर उपासमारीची वेळ आली. सरकारने गणेशोत्सवामध्ये वाजवण्यास परवानगी द्यावी आणि नुकसान भरपाई म्हणून एक लाख रुपयांची मदत जाहीर करावी. यामुळे आमचे झालेले नुकसान भरून निघणार नाही. मात्र, यापुढील कालावधीमध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पैशांचा उपयोग होईल. सरकारने आर्थिक मदत किंवा परवानगी दिली नाही तर कोरोनाने मरण्यापुर्वी उपासमारीने मारण्याची वेळ येईल.
-
अनिल चांदु दर्शनवाड, तरूण संगीतकार, बालाजी बँड पार्टी. लोणी ता. किनवट जि. नांदे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News