...तर सरकार तुम्हाला देणार १ कोटी रुपये..!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 March 2020
  • सरकारने जीएसटीमध्ये केले नवीन बदल 
    
  • योजनेची सुरुवात १ एप्रिलपासून होणार

नवी आर्थिक वर्षांत अनेक बदल करण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात काही प्रमाणात झाली आहे. सरकारने येत्या आर्थिक वर्षात जीएसटीमध्ये देखील बदल केले आहेत. यावरच सरकार एक नवी योजना आणणार आहे. यामुळे तुम्हाला तब्ब्ल १ कोटी रुपये मिळणार आहे. सरकारने जीएसटीमध्ये नवीन बदल केले आहेत. या योजनेची सुरुवात १ एप्रिलपासून होणार आहे.  

जीएसटी अंतर्गत एक लॉटरी काढण्यात येणार आहे. या लॉटरीच्या माध्यमातून चक्क एक कोटींचं बक्षीस मिळणार आहे. या लॉटरीमध्ये दुकानदार आणि खरेदी करणाऱ्यांचा समावेश असणार आहे. या दोघांमध्ये होणाऱ्या व्यवहारात प्रत्येक बिलाचा या स्कीममध्ये समावेश करण्यात आला आहे. या लॉटरीमध्ये ग्राहकांना १ कोटी रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे. 
 
यासाठी फक्त तुम्हाला दुकानदाराकडे पावती लागणार आहे. ग्राहकांनी वस्तू खरेदी केलेली कोणतीही पावती अपलोड लागणार आहे. यासाठी एक मोबाईल अ‍ॅप तयार करण्यात येणार आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून ती पावती अपलोड करण्यात येणार आहे. मार्च अखेरपर्यंत हे अ‍ॅप सर्वत्र उपलब्ध होणार आहे. 

यामध्ये विजेते निवडण्यात येणार आहे. राज्य स्तरावर हे बक्षीस देण्यात येणार आहे. पहिला, दुसरा व तिसरा विजेता निवडण्यात येणार आहे. 

ही योजना सुरु करण्यामागे एक कारण म्हणजे ग्राहकांना दुकानदाराकडून पावती मागून घेण्याची सवय लागावी. ग्राहकांना  प्रोत्सहन देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात येत आहे. यामध्ये १ लाख ते १ कोटींपर्यंत बक्षीस देण्यात येणार आहे. या माध्यमातून जीएसटी चोरी रोखण्यास मदत मिळणार आहे. तसेच विजेत्याला १ कोटी  रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News