रंगभूमी जगवा... 

सकाळ वृत्तसंस्था (यिनबझ)
Wednesday, 27 March 2019

आज २७ मार्च म्हणजेच जागतिक रंगभूमी दिन..!  सर्वप्रथम इ.स. १९६१ मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने हा दिवस जाहीर केला. पहिला जागतिक रंगभूमी दिन इ.स. १९६२ मध्ये साजरा झाला. त्यानंतर दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम व उपक्रमांद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा होतो. यानिमित्ताने जगभरातील नाट्यजगतातील महत्त्वाच्या व्यक्तींपैकी कुणीही एकजण दरवर्षी संदेश देतो. हा युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्त्वाचा भाग म्हणून ओळखला जातो. पहिल्या वर्षी १९६२ साली पहिला संदेश देणारी व्यक्ती म्हणजे ज्यो कॉक्चू होते.

आज रंगभूमीचे स्वरूप बदलताना दिसते. पूर्वीची नाटकं ही धार्मिक तर स्वातंत्र्य काळात प्रबोधन करणारे होती. आजची परिस्थिती वेगळी आहे. आजची नाटकं ही कमर्शियल (व्यावसायिक अधिक प्रबोधनात्मक) आहेत. या नाटकांतून समाज जीवनाचे प्रतिबिंब दाखवले जाते. काही नाटकांच्या माध्यमातून तसा प्रयत्न होत असला तरी ते प्रमाण कमी आहे. कारण प्रत्येकाची आवड ही वेगळी असते. कोणाला विनोदी तर कोणाला गंभीर, कोणाला ऐतिहासिक तर कोणाला सामाजिक असे विषयवार नाटकं आवडतात. आज महाराष्ट्र राज्य रंगभूमी दिन. मराठी रंगभूमीतील नाटय चळवळ पाहताना, याची माहिती घेताना, जागतिक पातळीवर ही लक्ष घालायला हवे. जागतिक पातळीवर नाटकांची कशी सुरुवात झाली हे ही पाहायला पाहिजे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News