.... म्हणून जुळ्या भावानेच केला खून 

अतुल पाटील
Wednesday, 27 February 2019

औरंगाबाद : तो हुशार आहे. त्याचेच घरात लाड केले जातात. या न्यूनगंडातून वयाने केवळ पाच मिनिटे मोठा असलेल्या जुळ्या भावाचा डोक्‍यात हातोडा घालून खून केला. आई लग्नाला गेलीय आणि भाऊ झोपलाय, हे पाहून लहान्याचे हा घात केलाय. हा खळबळजनक प्रकार औरंगाबादेतील कैलासनगर येथे मंगळवारी (ता. 26) दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आला. 

औरंगाबाद : तो हुशार आहे. त्याचेच घरात लाड केले जातात. या न्यूनगंडातून वयाने केवळ पाच मिनिटे मोठा असलेल्या जुळ्या भावाचा डोक्‍यात हातोडा घालून खून केला. आई लग्नाला गेलीय आणि भाऊ झोपलाय, हे पाहून लहान्याचे हा घात केलाय. हा खळबळजनक प्रकार औरंगाबादेतील कैलासनगर येथे मंगळवारी (ता. 26) दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आला. 

पोलिसांनी सांगितल्यानुसार, अरुण (नाव बदलले आहे. वय 15, रा. कैलासनगर) असे मृताचे नाव आहे. खाराकुआँ भागातील एका हायस्कूलमध्ये तो दहावीत शिक्षण घेत होता. अरुण अतिशय हुशार होता. त्यामुळे घरातील सदस्य आणि शिक्षकही त्याचा लाड पुरवायचे. ही बाब लहान भावाला सतत बोचायची. यातून त्याच्यात न्युनगंड वाढत गेला. शेवटी त्याच्या हातून मोठ्या भावाचा खून झाला. या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली. या घटनेची नोंद जिन्सी पोलिस ठाण्यात करण्यात आली. 

अरुणवर वार करुन लहान भाऊ तेथून तो पळून गेला. नागरिकांना शंका आल्याने पोलिसांना कळविले. अरुणच्या खुनानंतर पलंगावर तसेच आजूबाजूला रक्ताचा सडा आणि दरवाजा अर्धवट उघडा होता. पोलिस निरीक्षक श्‍यामसुंदर वसूरकर, सहायक निरीक्षक शरद जोगदंड, गुन्हे शाखेचे अधिकारी अजबसिंग जारवाल, उपनिरीक्षक दत्ता शेळके यांनी घरात पाहणी केली. दरम्यान फॉरेन्सिक लॅबच्या मदतीने पुरावे गोळा केले. त्यानंतर जिन्सी पोलिसांनी विचारपूससाठी लहान्याला ताब्यात घेतले. अरुणवर एक वार केल्यानंतर तो झोपेतून उठेल आणि उलट वार करेल, या भीतीने लहान्याने वारंवार डोक्‍यात वार केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

आई लग्नासाठी बाहेरगावी, दोघांनीच भरले पाणी 
जुळ्या भावंडांचे वडील रिक्षचालक होते. दहावर्षापूर्वी त्यांचे निधन झाले. तेव्हापासून त्यांची आई वृत्तपत्र विकून उदरनिर्वाह भागवत होती. 15 दिवसांपूर्वीच म्हणजे 10 फेब्रुवारीला वाढदिवस साजरा करण्यात आला. तीन दिवसांपुर्वी त्यांची आई नातेवाईकाच्या लग्न समारंभासाठी बाहेरगावी गेली होती. अरुण झोपायच्या आधीच दुपारीच दोघांनी मिळून घरात नळाचे पाणी भरले होते. तसेच दोघात कधी भांडणे झाले नसल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. म्हणूनच या प्रकारानंतर शहरभर हळहळ व्यक्‍त होत आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News