राजकारणींच्या थापा 

अशोक पवार
Wednesday, 28 August 2019

किती निवडणुका आल्या आणि गेल्या
प्रत्येक सरकारने तुला दाखवल्या वाकुल्या
 बघ एखादा बच्चू कडू मिळतो का?
जनते साठी खरचं कुणी लढतोय का?

कमळ अगदी फुलून आलयं
धनुष्य बाणाने लक्ष हेरलंय
घड्याळाचे काटे निखळत आहे
हातात मात्र काहीच नाही

इंजिन भी आता जोमात येईल
वंचीत  मात्र कोणाला तरी कोमात नेईल
विधान सभेच्या वारीला सुरुवात झाली
नेत्यांच मात्र कोण कुठं जाईल याचा भरवसा  नाही

घोषणांचा पाऊस पडतोय आता
मागील घोषणा नेते विसरले 
पण मतदार राजा तू विसरू नको
यांच्या भूल थापांना भीक घालू नको

किती निवडणुका आल्या आणि गेल्या
प्रत्येक सरकारने तुला दाखवल्या वाकुल्या
 बघ एखादा बच्चू कडू मिळतो का?
जनते साठी खरचं कुणी लढतोय का?

नाहीतर पाच वरश्यांनी येतात 
तश्याचं ह्या ही निवडणुका येऊन  जातील
मतदार राजा तुझ्या हातात 
निवडून आल्यावर पुन्हा तुरीच देतील

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News