ठरलं ! या तारखेपासून सुरु होणार मराठी शाळेत ई लर्निंगचा पाठ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 25 May 2020
  • शाळांचे शैक्षणिक वर्ष उशिरा सुरू झाल्यास चालू शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रम पूर्ण शिकवण्याचे आव्हान शाळांसमोर असणार आहे.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळांचे प्रत्यक्ष वर्ग भरवणे अशक्‍य वाटत असल्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळांनीही आता व्हर्च्युअल वर्ग भरवण्यास सुरुवात केली आहे. 1 एप्रिलपासून मोबाईलवर अनौपचारिक अभ्यासवर्ग आयोजित करणाऱ्या सायन येथील डी. एस. हायस्कूलने 1 जूनपासून शाळेचे नियमित डिजिटल वर्ग घेण्याची तयारी केली आहे.

कोरोनामुळे शाळा दर वर्षीप्रमाणे यंदाही 15 जूनला उघडणार काय, याकडे सर्व पालकांचे लक्ष लागले आहे. शाळांचे शैक्षणिक वर्ष उशिरा सुरू झाल्यास चालू शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रम पूर्ण शिकवण्याचे आव्हान शाळांसमोर असणार आहे. त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून काही शाळांनी प्रायोगिक पातळीवर झूम या मोबाइल ऍपवर इयत्ता पहिली ते दहावीचे वर्ग एप्रिल व मे महिन्यात घेतले. सायन येथील डीएस शाळेने व्हर्च्युअल वर्ग सुरू करण्याची तयारी केली आहे.

शाळेने एप्रिल ते मे महिन्यात मोबाईल ऍपवर वर्ग घेतले. काही तुकड्यांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती 95 टक्के असायची, तर काही तुकड्यांमध्ये 60-70 टक्के. त्यामुळे आता 1 जूनपासून झूम ऍपवर दररोजच्या 40 मिनिटांच्या प्रत्येकी चार तासिकांना विद्यार्थ्यांची उपस्थिती 100 टक्के लागावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना विश्‍वासात घेण्यासाठी आम्ही गेल्या दोन महिन्यात झूम ऍपवर अनेकदा पालक सभा घेतल्या आणि पालकांच्या मनातील शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला
- राजेंद्र प्रधान, अध्यक्ष, डी. एस. हायस्कूल

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News