Thappad Trailer : माझ्या नवऱ्याने मारलं तर मीही नोंदवणार तक्रार; Video viral

यिनबझ टीम
Wednesday, 5 February 2020

"जर माझा पती माझ्यावर हात उचलेल तर मीही त्याला पोलिसांकडे घेऊन जाईन"

सध्या तापसी पन्नूचा आगामी चित्रपट थप्पडची मोठ्याप्रमाणात चर्चा होताना पाहायला मिळते. एका महिलेनेदेखील यासंबंधीचं मत एका व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केलं आहे. तापसीच्या थप्पडने प्रेरित होऊन "जर माझा पती माझ्यावर हात उचलेल तर मीही त्याला पोलिसांकडे घेऊन जाईन", अशा प्रकारचं मत एका महिलेने मांडलं आहे.

अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या आगळ्यावेगळ्या भुमिकेतून प्रेषकांच्या भेटीला येत आहे. तिचा आगामी चित्रपट घरामध्ये महिलांवर होणारे अत्याच्यार, अन्याय यांवर आधारित आहे. एका पार्टीमध्ये तिचा पती तिच्यावर हात उचलतो, म्हणून तापसी आपल्या पतीच्या विरुध्द तक्रार नोंदवते. समाजामध्ये असेलेलं स्त्रीचं दुय्यम स्थान आणि तिच्यावर तिच्या घरातूनच वारंवार होणाऱ्या अत्याचारांवर कशाप्रकारे आवाज उठवता येईल, हेच या चित्रपटातून दाखण्याचा प्रयत्न केला आहे.

 

व्हायरल झालेला व्हिडीओ शेअर करत तापसीने यावर आपलं मत नोंदवलं आहे. हे असं पाहून माझ्याही डोळ्यातून पाणी आलं, अशाचप्रकारे कितीतरी महिला दिवसरात्र आपल्या पतीचे आणि सासरच्यांचे हाल सहन करत असतात. त्या स्त्रीला असलेली मजबुरी हे एका विषापेक्षा कमी नसते, असे मत तिने या ट्विटमध्ये मांडलं आहे. मी आशा व्यक्त करते की या व्हिडीओमधील महिला तिच्या पतीचे आत्याचार चुपचाप सहन करणार नाही, उलट त्याला चांगंल उत्तर देईल, अशाप्रकारची कमेंट करत तापसीने एक व्हिडीओ शेअर केला आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News