सातारकर तुमचे आभार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 23 May 2019

" सातारा कडून " सर्वांनी
माणुसकी शिकली पाहिजे
हीच आपली संस्कृती आहे
सर्वानीच ती जपली पाहिजे

लातूरची तहान भागवण्या
"कोयना माई "आली धाऊन
डोळ्यांत आमच्या पाणी आलं "पाण्याची रेल्वे" पाहून
तहानलेल्याला पाणी देण्यास
तुम्ही विरोध केला नाही
एकही " सातारकर "
कोर्टा मधे गेला नाही
खूप दूर असून सुद्धा
मराठवाडयासाठी धाऊन आलात
काळजात आमच्या कायमचे
खूप खोल रुतून गेलात
संकटकाळी धाऊन येणं
आम्ही कधी विसरणार नाही
तुमच्यावर संकट आल्यावर
" मराठवाडा " घरात बसणार नाही
" सातारा कडून " सर्वांनी
माणुसकी शिकली पाहिजे
हीच आपली संस्कृती आहे
सर्वानीच ती जपली पाहिजे
ऋणानुबंध काय आहेत
ईश्वरालाच माहीत
सोनेरी अक्षरात लिहू
" सातारा" आमच्या वहीत
राजकारणी , कर्मचारी
सर्वांचे आभार
पाणी पाजण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले फार...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News