ठाण्याच्या महानगरपालिकेने राबवला एक नवा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 1 November 2019

१४ दिवसांची ही मोहिम असून यामध्ये १ लाख ४७ हजार घरांमधून एकूण ५ लाख ८१ हजार १८० लोकांची तपासणी केली.

ठाणे - सध्याच्या धावपळीच्या जगात पौष्टिक आहाराकडे दुर्लक्ष करुन अनेकजण सर्रास फास्ट फूडची निवड करतात, पण आहारात नियमित फास्ट फूडचा वापर केल्याने शरीराला पौष्टिक घटक मिळत नाहीत. त्याचा परिणाम शरीरावर होतो आणि  त्यातूनच नवीन आजार उद्धभवतात.

प्रत्येक जण कामाच्या धावपळीमध्ये येणाऱ्या रोगराईकडे दुर्लक्ष करत असतो. यावर उपाय म्हणून ठाणे महानगर पालिकेने एक नवीन संकल्पना राबवली आहे. १४ दिवसांची ही मोहिम असून यामध्ये १ लाख ४७ हजार घरांमधून एकूण ५ लाख ८१ हजार १८० लोकांची तपासणी महानगर पालिकेकडून करण्यात आली. क्षयरोग, कुष्ठरोग आणि संसर्गजन्य रोग अशा तीन वेगवेगळ्या तपासण्या यावेळी करण्यात आल्या असून यामध्ये अतिताणाचे सर्वाधिक रुग्ण आढळल्याचे दिसून आले.

तपासणीदरम्यान क्षयरोगाचे १ हजार १३३ रुग्ण असल्याचेदेखील आढळून आले.  सीबीनॅट तपासणीनंतर ९५१ रुग्णांपैकी ४९ रुग्ण आढळले तर कुष्ठरोग चाचणीतही १ हजार ८३० संशयित रुग्णांपैकी २३ रुग्ण आढळले.

मोहिमेत आढळलेल्या रुग्णांची पुढील तपासणी व त्यासंबंधीत औषधोपचार केले जात असून कर्करोगामध्ये मेमोग्राफी व्हॅन तसेच मोबाईल एक्सरे व्हॅन या साधनांचा वापर केला जात  आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News