'थॅलेसेमिया' या आजाराचे रूग्ण जगू शकतात, सर्वसामान्यांप्रमाणे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 9 May 2019

औरंगाबाद - सर्वांना निरोगी आयुष्य मिळेलच असे होत नाही; मात्र ज्यांच्या पदरी आजार आला, त्यांनी निराशेत जगण्यापेक्षा आशावादी राहिले पाहिजे. रुग्णांना उपचारासोबत मायेची फुंकरही गरजेची असते. थॅलेसेमियाचे रुग्ण सर्वसामान्यांप्रमाणे जगू शकतात. त्यासाठी त्यांना उपचारासोबत सकारात्मक वातावरण आणि प्रेमाचा संवाद गरजेचा आहे, असे मत अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी व्यक्त केले. 

औरंगाबाद - सर्वांना निरोगी आयुष्य मिळेलच असे होत नाही; मात्र ज्यांच्या पदरी आजार आला, त्यांनी निराशेत जगण्यापेक्षा आशावादी राहिले पाहिजे. रुग्णांना उपचारासोबत मायेची फुंकरही गरजेची असते. थॅलेसेमियाचे रुग्ण सर्वसामान्यांप्रमाणे जगू शकतात. त्यासाठी त्यांना उपचारासोबत सकारात्मक वातावरण आणि प्रेमाचा संवाद गरजेचा आहे, असे मत अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी व्यक्त केले. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बालरोग विभागातर्फे बुधवारी (ता. आठ) जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त थॅलेसेमिया रुग्ण-पालक संवाद व स्नेहमेळावा महात्मा गांधी सभागृहात पार पडला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने, बालरोग विभागप्रमुख डॉ. प्रभा खैरे, विकृतिशास्त्र विभागाचे डॉ. मुळे, औषधवैद्यकशास्त्र विभागाचे डॉ. प्रभाकर जिरवणकर, सर्जरी विभागप्रमुख डॉ. सरोजिनी जाधव, नवजात शिशू विभागप्रमुख डॉ. अमोल जोशी, हनुमंत रुळे, सुनीता बनकर यांची उपस्थिती होती. 

थॅलेसेमिया या आजारावर प्रतिबंधात्मक उपायांची गरज असून, तरुण तरुणींनी लग्नापूर्वीच यासाठी चाचणी करून घेणे गरजेचे आहे, असे डॉ. प्रभा खैरे म्हणाल्या. आजाराला धैर्याचे सामोरे गेल्याने गेली अठरा वर्षे प्रवास करणे सोपे झाल्याचे सांगत घाटीने जन्मापासून आतापर्यंत दिलेल्या साथीबद्दल ऋण मयूरी जाधव हिने व्यक्‍त केले. 

यावेळी मयूरी व तिची आईची मुलाखत डॉक्‍टरांनी घेतली. त्याला तज्ज्ञ डॉक्‍टरांनी उत्तरे दिली. यावेळी ७० थॅलेसेमिया रुग्ण व पालकांची उपस्थिती होती. यावेळी वॉर्ड २४, २५, २६ च्या परिचारिकांचेही विशेष आभार मानण्यात आले.  इन्चार्ज रजनी कुलकर्णी, जयश्री जाधव, उषा तिरटे, विद्या रक्षाळकर यांची उपस्थिती होती. 

यावेळी रक्‍तदान शिबिर समन्वयक डॉ. सय्यद वहाब, डॉ. उबेद रहेमान, डॉ. सतीश मसलेकर, डॉ. समाधान ढाकणे, डॉ. स्मिता मुंदडा, डॉ. तृप्ती जोशी डॉ. अमित पाटील, डॉ. नीलेश हातझाडे, डॉ. विज्ञासागर पाटील, डॉ. प्रशांत अगलदरे, डॉ. विनिता, डॉ. प्रियांका धोंडगे, डॉ. तेजस मंडलेचा यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. डॉ. प्रज्ञा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रतिभा गर्ग यांनी आभार मानले.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News