टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर; येथे पाहा निकाल

स्वप्नील भालेराव (सकाळ वृत्तसेवा- यिनबझ)
Thursday, 6 August 2020

एकूण दोन्ही पेपरमध्ये १६ हजार ५९४ उमेदवार पात्र आहेत. गेल्या वर्षी २०१८ मध्ये ९ हजार ६७७ विद्यार्थी पास झाले होतो. यंदा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना टीईटी परीक्षेत यश मिळाले आहे.

मुंबई : अनेक दिवसापासून प्रलंबित असलेला महाराष्ट्र शिक्षण पात्रता परीक्षेचा ( टीईटी ) निकाल अखेर बुधवारी सायंकाळी पाच वाजता जाहीर झाला. यंदा एकूण १६ हजार ५९२ विद्यार्थी परीक्षेत पास झाले आहेत. १९ जानेवारी २०२० रोजी राज्य शिक्षण पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. यावेळी पेपर क्रमांक एक पहिली ते पाचवी आणि पेपर क्रमांक दोन सहावी ते आठवी असे दोन पेपर घेण्यात आले होते. या दोन्ही पेपरचा निकाल टीईटीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला. जे उमेदवार टीईटी परीक्षा पास झाले आहेत त्यांचे गुण प्रमाणपत्र प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे उपलब्ध होणार आहे.

सामाजिक आरक्षण, वैकल्पिक विषय, दिव्यांग इत्यादी बाबत विद्यार्थ्यांना अडचण असल्यास १५ ऑगस्ट २०२० पर्यंत पुराव्यासह शिक्षण परिषदेकडे तक्रार दाखल करावी. ही तक्रार उमेदवारांनी आपल्या लॉगीन आयडी मधून ऑनलाईन करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी केले आहे. 

निकालाची आकडेवारी

यंदा पहिल्या परीक्षेला एक लाख ८८ हजार ६८८ उमेदवार बसले होते त्यापैकी १० हजार ४८७ उमेदवार पास झाले. १ लाख ५४ हजार ५९६ उमेदवारंनी पेपर क्रमांक दोनची परीक्षा दिली होती त्यापैकी ६ हजार १०५ उमेदवार पास झाले. एकूण दोन्ही पेपरमध्ये १६ हजार ५९४ उमेदवार पात्र आहेत. गेल्या वर्षी २०१८ मध्ये ९ हजार ६७७ विद्यार्थी पास झाले होतो. यंदा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना टीईटी परीक्षेत यश मिळाले आहे. २०१३ ते २०१९ पर्यंत टीईटी परीक्षा घेण्यात आली. फक्त २०१६ यावर्षी परीक्षा झाली नाही.

येथे पाहा टीईटीचा निकाल: www.mahatet.in

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News