'या' कारणामुळे तरूणाई मध्ये वाढतोय टेस्टिरकुलर कॅन्सर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 December 2019

टेस्टिरकुलर कॅन्सर होण्याचं एक मोठं कारण म्हणजे गांजाचा चुकीच्या पद्धतीने होणारा वापर असे सांगण्यात आले आहे.

पुरूषांमध्ये १ ते २ टक्के लोकांना टेस्टिकुलर कॅन्सर होतो. मात्र अमेरिकेत करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये तरूणांमध्ये या कॅन्सरचं प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे.

कॅन्सर वाढण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. यामध्ये बायोलॉजिकल आणि जेनेटिक हे कारण देखील असू शकते. पण टेस्टिरकुलर कॅन्सर होण्याचं एक मोठं कारण म्हणजे गांजाचा चुकीच्या पद्धतीने होणारा वापर असे सांगण्यात आले आहे. 

फ्रेड हचिंसन कॅन्सर रिसर्च सेंटरचे डॉ. स्टीफन श्र्वार्ट्ज यांच्या नेतृत्वातील टीमने केलेल्या रिसर्चमधून असे आढळले आहे की, जे तरूण रोज किंवा आठवड्यातून एकदा गांजाचे सेवन करतात, त्यांच्यात टेस्टिकल्ससंबंधी कॅन्सर होण्याचा धोका अधिक वाढतो. हेच कारण आहे की, या कॅन्सरचे रूग्ण हे तरूण वयातील आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News