घाबरलेल्या पाकिस्तानने बंद केलं, हे दहशतवादी तळ 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019

कोटलीमध्ये आणि मुझफ्फराबाद प्रत्येकी पाच आणि बर्नालामध्ये एक असे ११ दहशतवादी तळ पाकिस्तान व्याप्त परिसरात सुरु असल्याचे पुरावे भारताने नूकतेच सादर केले होते. सध्या सुंदरबनी आणि राजौरीच्या विरुद्ध दिशेला कोटली, निकियल भागात सुरु असलेले दहशतवादी तळ बंद करण्यात भारताला यश आले आहे.

दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त बालाकोट परिसरातील दहशतवादी तळावरती मोठी कारवाई केली, तसेच भारताने आंतरराष्ट्रीय दबाव आणल्यानंतर दहशतवादी तळ बंद केले. पाकिस्थान लष्कराच्या मदतीने काश्मिर परिसरात दहशतवादी तळ सुरु असल्याचे पुरावे भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर केले होते. त्यामुळे भारताने अशा प्रकारे दबाव आणल्याने पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे.

कोटलीमध्ये आणि मुझफ्फराबाद प्रत्येकी पाच आणि बर्नालामध्ये एक असे ११ दहशतवादी तळ पाकिस्तान व्याप्त परिसरात सुरु असल्याचे पुरावे भारताने नूकतेच सादर केले होते. सध्या सुंदरबनी आणि राजौरीच्या विरुद्ध दिशेला कोटली, निकियल भागात सुरु असलेले दहशतवादी तळ बंद करण्यात भारताला यश आले आहे. लष्कर-ए-तय्यबाकडून हे तळ चालवले जात होते. तसेच जैश-ए-मोहम्मदकडून पाला आणि बाघ भागात चालवले जाणारे दहशतवादी तळही बंद झाले आहेत.

गुप्तचर यंत्रणांच्या दिलेल्या माहितीनूसार मुझफ्फराबाद आणि मीरपूरजवळ असलेले दहशतवादी तळही बंद झाले आहेत. लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीनचे हे तळ तात्पुरते बंद झाल्याचे गुप्तचर यंत्रणांनी सांगितले आहे. बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानातून घुसखोरीचा प्रयत्न झालेला नाही. पाकिस्तानने सीमेवरील तणावही कमी करण्याची विनंती केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News