तेरेखोलाचा किल्ला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 22 June 2020

महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेवर तेरेखोल नदी जिथे समुद्राला मिळते, त्या तेरेखोल खाडीच्या मुखाजवळील टेकडीवर तेरेखोलचा किल्ला उभा आहे. या किल्ल्याचे हॉटेलात रूपांतर गोवा सरकारने केलेले आहे. पूर्वीच्या काळी या गडाचा उपयोग तेरेखोलची खाडी आणि समुद्रावर नजर ठेवण्यासाठी करण्यात आला होता. 

महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेवर तेरेखोल नदी जिथे समुद्राला मिळते, त्या तेरेखोल खाडीच्या मुखाजवळील टेकडीवर तेरेखोलचा किल्ला उभा आहे. या किल्ल्याचे हॉटेलात रूपांतर गोवा सरकारने केलेले आहे. पूर्वीच्या काळी या गडाचा उपयोग तेरेखोलची खाडी आणि समुद्रावर नजर ठेवण्यासाठी करण्यात आला होता. 

१७ व्या शतकात सावंतवाडीच्या खेमसावंतांनी या किल्ल्याची उभारणी पोर्तुगिजांवर लक्ष ठेवण्यासाठी केली. पोर्तुगिजांना हे सहन न झाल्याने १७४६ मध्ये त्यांनी किल्ला जिंकून घेतला आणि त्याचे नुतनीकरण केले.

किल्ल्यातील चर्च आणि पोर्तुगिज बांधणीचे वैशिष्ट्य असलेले कॅप्सुल बुरूज त्यावेळी बांधण्यात आले. १९७४ मध्ये थोड्या काळासाठी हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. पोर्तुगिजांनी तो परत जिंकून घेतला.

गोव्यात जन्मलेल्या डॉ. बरनादी पेरेस डिसिल्वा हे १८२५ मध्ये गर्व्हनर झाले. त्यांनी तेरेखोलच्या किल्ल्यातून पोर्तुगिजांनी मोडून काढला.

१५ ऑगस्ट १९५४ रोजी अल्फ्रेड आल्फांसो यांच्या नेत्वृखाली गोवा मुत्त्की संग्रामच्या कार्यकर्त्यांनी किल्ला १ दिवसासाठी ताब्यात घेतला होता. 

१५ ऑगस्ट १९९५ रोजी पनवेल येथील हिरवे गुरूजी (तुळशीदास बाळकृष्ण हिरवे) आणि शेषनाथ वाडेकर यांच्यासह १२७ निशस्त्र कार्यकर्त्यांनी किल्ल्यासमोर सत्याग्रह केला. त्यावेळी पोर्तुगिजांनी केलेल्या गोळीबारात हिरवे गुरूजी आणि शेषनाथ वाडेकर शहीद झाले. त्यांचे स्मारक किल्ल्यासमोर डाव्या हाताला आहे. १९६१ ला गोवा मुत्त्क झाला. ९ डिसेंबर १९७६ ला किल्ल्याचे हेरिटेज हॉटेलमध्ये रूपांतर करण्यात आले.

गोवा सरकारने या छोटेखानी किल्ल्याचे तारांकित हॉटेलमध्ये रूपांतर केल्यामुळे गडाच्या आतील भागाची मुळची रचना बदलेली आहे. गडाच्या दक्षिणमुखी प्रवेशव्दाराने आत गेल्यावर समोर पोर्तुगिज कालीन “सेंट ऍन्थोनी” चर्च दिसते हे चर्च बहुतांश वेळा बंद असल्यामुळे आतून पाहाता येत नाही. चर्चच्या मागे उजव्याबाजूस असलेल्या जिन्याने मागील बुरूजावर जाता येते. तिथे पोर्तुगिज बांधणीचे वैशिष्टय असलेला कॅप्सुल बुरूज पाहाता येतो. चर्चच्या डावीकडील म्हणजेच समुद्राकडील बाजूला हॉटेलच्या खोल्या आहेत. किल्ल्याच्या तटावरून प्रवेशव्दारापर्यंत फेरी मारून गड दर्शन आटोपते घ्यावे लागते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News