जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दहावी-बारावीचा निकाल ? 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 10 July 2020

आयसीएसईच्या परीक्षेचा निकाल दुपारी आहे, त्यांना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी महाराष्ट्रातील निकाल जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत लागणार असल्याची माहिती त्यांनी सांगितली. 

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दहावी-बारावीचा निकाल ? 

महाराष्ट्र - महाराष्ट्रात दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असताना कोरोनाचा संसर्ग वाढला. तेव्हापासून आत्तापर्यंत यंदाच्या शैक्षणिक वर्षाच काय होईल ? या साशंकतेमध्ये विद्यार्थी आणि पालक आहेत. कारण परीक्षा होऊन कित्येक महिने उलटले तरी अजून निकाल लागलेला नाही. परंतु दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल लागणार आहे अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यादरम्यान घेतल्या होत्या. प्रत्येक वर्षी दहावी-बारावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात येतो. पण यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पेपर तपाणीसाच्या कामाला अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे यंदाचा निकाल जाहीर करण्यास उशीर होत असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड सांगितले. 

आयसीएसईच्या परीक्षेचा निकाल दुपारी आहे, त्यांना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी महाराष्ट्रातील निकाल जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत लागणार असल्याची माहिती त्यांनी सांगितली. 
 
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेला १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. तसेच कोरोनामुळे दहावीचा भूगोलाचा पेपर होऊ शकला नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना सरासरी नुसार गुण देण्यात आले आहेत. बारावीच्या १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थींनी परीक्षा दिली होती. या महिन्या शेवटच्या आठवड्यात दहावी-बारावीच्या परीक्षेचे निकाल लागण्याची शक्यता आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News