दहावी, बारावीची फेर परीक्षा ६ ऑक्‍टोबरपासून

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 August 2020
  • फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये झालेल्या दहावी, बारावी परीक्षेत उत्तीर्ण न होऊ शकलेल्या, तसेच एटीकेटीसाठी पात्र विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा ऑक्‍टोबरमध्ये घेण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला आहे.
  • या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक मंडळाकडून जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार ६ ऑक्‍टोबरपासून परीक्षा सुरू होणार आहेत.

मुंबई :- फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये झालेल्या दहावी, बारावी परीक्षेत उत्तीर्ण न होऊ शकलेल्या, तसेच एटीकेटीसाठी पात्र विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा ऑक्‍टोबरमध्ये घेण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला आहे. या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक मंडळाकडून जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार ६ ऑक्‍टोबरपासून परीक्षा सुरू होणार आहेत.

दहावीची परीक्षा ६ ते २३ ऑक्‍टोबरदरम्यान, तर बारावीची परीक्षा ६ ते २९ ऑक्‍टोबरदरम्यान होईल. व्यवसाय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ६ ते २४ ऑक्‍टोबरदरम्यान होईल. दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी परीक्षा १ ते २३ ऑक्‍टोबर, तर दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्य शिक्षण विषयाची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा २४ ते ३१ ऑक्‍टोबरदरम्यान होईल. बारावीची प्रात्यक्षिक, लेखी व श्रेणी परीक्षा १ ते २९ ऑक्‍टोबरदरम्यान होणार आहे. संभाव्य वेळापत्रकाबाबत अभिप्राय, सूचना व दुरुस्त्या ई-मेलद्वारे १७ ऑगस्टपर्यंत secretary.stateboard@gmail.com या मेलवर पाठवण्याच्या सूचना मंडळाने केल्या आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News