राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना "व्ही स्कूल" द्वारे मिळणार मोफत ऑनलाईन शिक्षण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 20 July 2020
  • कोरोना विषाणूचा प्राधुरभाव दिवसेंदिवस वाढत असल्याने शाळा आणि कॉलेज या सारख्या शिक्षण संस्था पुन्हा प्रत्यक्षात कधी सुरु होती याबद्दल सध्या  कोणीच सांगू शकत नाही.

पुणे :-  कोरोना विषाणूचा प्राधुरभाव दिवसेंदिवस वाढत असल्याने शाळा आणि कॉलेज या सारख्या शिक्षण संस्था पुन्हा प्रत्यक्षात कधी सुरु होती याबद्दल सध्या  कोणीच सांगू शकत नाही. परंतु कोरोनाच्या महामारीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचं नुकसान होऊ नये यासाठी शासनाने सर्व शिक्षण संस्थांना ऑनलाईन वर्ग भरवून शिक्षण सुरु ठेवण्याचे आदेश दिले. शासनाच्या आदेशावरून अनेक शाळांनी ऑनलाईन पद्धतींचा वापर करून शिकवण्यास सुरुवात केली. शहरात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारी साधने घेणं थोड सोप्प आहे परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण आर्थिक परिस्थितीमुळे परवडण्यासारखे नाही. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे पालक हे सुशिक्षित नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास फार अडचणी निर्माण होत आहेत ह्या सर्व अडचणी लक्षात घेऊन आणि विद्यार्थ्यांची गरज ओळखून  ‘वॉवेल्स ऑफ द पिपल असोसिएशन' म्हणजेच वोपा या संस्थेमार्फत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्याकरीता व्ही स्कूल ह्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. हा उपक्रम ‘वॉवेल्स ऑफ द पिपल असोसिएशन' म्हणजेच वोपा आणि बीड जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु केला गेला आहे. व्ही स्कूल ह्या उपक्रमाचा राज्यातील दहावीच्या लाखो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. व्ही स्कूल ह्या उपक्रमाची निर्मिती होत असताना शिक्षण क्षेत्रातील अनेक तज्ञ मंडळींची मदत घेण्यात आली आहे.

 

व्ही स्कूल ह्या उपक्रमाची वैशिष्टय म्हणजे हा उपक्रम मुख्यत्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आला आहे. हा प्लॅटफॉर्म मोबाईल मधील कोणत्याही इंटरनेट ब्राऊजरवर उघडेलं. तसेच ऑनलाईन शिक्षण घेताना विद्यार्थ्यांवर फक्त व्हिडिओस चा भडीमार होऊ नये या करता फोटोस, जिआयफ या सारख्या रंजक गोष्टी देखील असतील आणि या उपक्रमात एकाच मोबाईल वरून अनेक विद्यार्थी अभ्यास करू शकतील अशी सुविधा आहे. व्ही स्कूल मध्ये शाळा आणि शिक्षक या दोघांची ही सक्रिय भूमिका असणार आहे आणि याच प्रमाणे वही, पेन, पुस्तक, परिसर आणि शिक्षक यांचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम कमी होईल अशी रचना यात करण्यात आली आहे.

 

व्ही स्कूल ह्या द्वारे ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घेण्यासाठी तुमच्या मोबाईल च्या कोणत्याही ब्राऊझरमध्ये ssc.vopa.in असा टाईप करावं. तेथे तुम्हाला व्ही स्कूल ऑनलाईन शिक्षणाचा प्लॅटफॉर्म दिसेल तेथे क्लिक करून तुम्हाला ज्या विषयाचा अभ्यास करायचा आहे त्याचे पाठ क्रमांक निवडा आणि पुढच्या काही क्षणात तुम्ही निवडलेला पाठ तुमच्या स्क्रीनवर दिसेल. मागील एका महिन्यात व्ही स्कूल ह्या प्लॅटफॉर्मला वीस लाखांहून अधिक जणांनी भेट दिली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News