दहावी बारावीचा “तेरावा” घातला... शिक्षण पध्दती बदलली

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 30 July 2020

३४ वर्षातनंतर केंद्र सरकारनं नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मंजुरी मिळाल्यानंतर त्यांनी हे मत मांडलं आहे. 

दहावी बारावीचा “तेरावा” घातला... शिक्षण पध्दती बदलली

महाराष्ट्र - तब्बल ३४ वर्षातनंतर केंद्र सरकारनं नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिल्याने समाजमाध्यांवर विविध प्रतिक्रिया येणार सुरूवात झाली आहे. शैक्षणिक धोरणात अमुलाग्र बदल झाल्याने दहावी आणि बारावीचं महत्त्व कमी होईल. झालेल्या बदलाचं स्वागत करत दिग्दर्शक केदार शिंदेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. 

दहावी बारावीचा “तेरावा” घातला... शिक्षण पध्दती बदलली. आनंद आहे.. आता मुलांची रॅट रेस संपवा. जगू द्या त्यांना. कधी कधी वाटतं पालकांची परीक्षा घ्यायला हवी. तसाही त्यांचा आभ्यास झालेलाच असतो. असं दिग्दर्शक केदार शिंदेंनी सोशल मीडियाच्या माध्यातून मांडलं आहे. ३४ वर्षातनंतर केंद्र सरकारनं नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मंजुरी मिळाल्यानंतर त्यांनी हे मत मांडलं आहे. 

अनेक वर्षानंतर शिक्षण धोरणात बदल करण्यात आल्याने अनेकांनी आपली प्रतिक्रिया सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. आताचं शैक्षणिक धोरण हे समन्वयी करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अभियांत्रिकी व संगीत या दोन्ही विषयात उच्च शिक्षण पुर्ण करता येणार आहे. पूर्वीची १० + २ आताची ५ +३ +३ +४ अशी झाली आहे. 

१५ वर्षांमध्ये शालेय शिक्षण असे विभागण्यात आले आहे
तीन वर्षे पूर्वप्राथमिक
दोन वर्षे पहिली व दुसरी
तीन वर्षे तिसरी ते पाचवी
तीन वर्षे सहावी ते आठवी 
अखेरची ४ वर्षे नववी ते बारावी 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News