सचिनच्या मुलाला मुंबई इंडियन्सच्या संघात स्थान?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 15 September 2020

सचिनच्या मुलाला मुंबई इंडियन्सच्या संघात स्थान?

सचिनच्या मुलाला मुंबई इंडियन्सच्या संघात स्थान??

भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडूलकरला भारतात क्रिकेटचा देव म्हणून अनेकदा संबोधल जातं. सचिनला बाद करण्यासाठी अनेक गोलदाजांनी मोठी कसरत करावी लागत होती. अनेकदा सचिनची बॅटींग पाहत असताना लोकं टिव्हीसमोरून हलत नव्हती. कारण सचिनची बॅटिंग अशी होती की त्याचे जगभरात चाहते निर्माण झाले. सचिनचा मुलगा अनेक दिवसांपासून क्रिकेटचं ट्रेनिंग घेतोय. अनेकदा तो ऑस्ट्रेलियातील काही खेळाडूंसोबत दिसला आहे. त्याचा एक फोटो मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसोबत दिसल्याने सचिनच्या मुलाला मुंबई इंडियन्सच्या संघात स्थान मिळाल्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

सचिन तेंडूलकर हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा अनेक वर्षे सदस्य राहिलेला आहे. तसेच सचिनचा मुलगा अर्जुन सुध्दा अनेकदा मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसोबत नेटमध्ये सराव करताना दिसलेला आहे. कोरोनामुळे यंदाचा १३ वा मोसम दुबईत खेळवला जाणार आहे. कारण भारतात आयपीएल घेण्यासारखी परिस्थिती नसल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. सुरूवातीचा सामना १९ तारखेला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात होणार असून अर्जुन खेळाडूंसोबत असलेला फोटो प्रचंड व्हायरल झाला असून सोशल मीडियावरती अर्जुनला संघात स्थान मिळाल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

फोटो इतका व्हायरल झाला आहे की, अनेकांनी आपल्या मनातील शंका सोशल मीडियावरती बोलून दाखविली आहे. पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असून अर्जुन मुंबई इंडियन्स संघात नेट बॉलर म्हणून गेला आहे. आयपीएल दरम्यान प्रत्येक संघ आपल्यासोबत नेट बॉलर ठेवत असतो. अर्जुन फक्त फलंदाजांना नेटमध्ये गोलंदाजी करणार आहे.

विजेतेपद मिळविलेल्या मुंबईसमोर चेन्नईचं मोठ आव्हान समोर असणार आहे. दोन्ही संघातील सामने नेहमी रंगत असतात. त्यामुळे यंदाचं आयपीएल चषक कोण जिंकेल याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. सामने दुबईत होणार असल्याने तिथं कोणताही संघ विजेता होवू शकतो असं क्रिकेट तज्ज्ञांचं मत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News