बायकोला खूश ठेवण्यासाठी हे १० टिप्स वापरा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 26 September 2019

तुमचं हे नातं टिकवण्यासाठी आणि उत्तरोत्तर घट्ट करण्यासाठी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. कोणतंही नातं हे पैशांवर नाही तर भावनेवर टिकतं. सर्वसामान्यपणे पत्नीला महागड्या भेटवस्तू दिल्या तर ती खूश होते असा विचार अनेक पुरुष करतात. पण यात कोणतंही तथ्य नाही. 

तुमचं हे नातं टिकवण्यासाठी आणि उत्तरोत्तर घट्ट करण्यासाठी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. कोणतंही नातं हे पैशांवर नाही तर भावनेवर टिकतं. सर्वसामान्यपणे पत्नीला महागड्या भेटवस्तू दिल्या तर ती खूश होते असा विचार अनेक पुरुष करतात. पण यात कोणतंही तथ्य नाही. 

कोणत्याही नात्यासाठी सर्वात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे प्रेम. महागड्या हिऱ्याच्या अंगठीपेक्षा एक गुलाबाचं फुल दिलं तरी तुमची पत्नी खूश होईल.

पत्नीसाठीचं प्रेम आणि आत्मियता तुम्ही सांगत रहाल तर तुमच्यातलं प्रेम कधीच कमी होणार नाही. जर तुमच्या नात्यात प्रेमच नसेल तर बाकी सर्व नाती निरर्थक ठरतात. 

पत्नीला वेळ देणंही गरजेचं आहे. तिला हा विश्वास दाखवा की तुम्ही त्यांच्यासोबत आहात. तुम्ही ऑफिसच्या कामात कितीही व्यग्र असला तरी हे विसरू नका की जेवढं तुमचं काम महत्त्वाचं आहे तेवढंच तुमचं नातंही महत्त्वाचं आहे. पत्नीला तिचा पूर्ण दिवस कसा गेला याबद्दल विचारा आणि त्यानंतर स्वतःच्या दिवसाबद्दल सांगा. यामुळे एक घट्ट नातं तयार होतं.

परिस्थितीनुसार तुम्ही पत्नीच्या बोलण्याचं उत्तर देणं गरजेचं आहे. तिच्या प्रत्येक गोष्टीवर होकारार्थीच बोललं पाहिजे असं काही गरजेचं नाही. असं केलं तर तिला वाटेल तुमचं तिच्या बोलण्याकडे लक्ष नाही.

संसारातल्या प्रत्येक गोष्टी या दोघांनी मिळून करायच्या असतात. घर आणि मुलं सांभाळण्याची जबाबदारी फक्त पत्नीचीच नाही हे लक्षात ठेवा.

एकत्र फिरायला जायला कधीही विसरू नका. यावेळी एकत्र घालवलेले क्षण तुम्ही संपूर्ण आयुष्यात कधीही विसरू शकणार नाहीत. यामुळे तुम्ही माणूस म्हणून प्रगल्भ तर होतातच शिवाय एकमेकांना समजून घ्यायला अधिक मदत होते.

माफी मागितल्याने तुम्ही लहान आणि पत्नी मोठी होईल असं नाही. जिथे सॉरी बोलण्याची गरज आहे तिथे नक्की बोला. यात कुठेही इगो मध्ये आणू नका.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News