सांग, कुठे देऊ वर्दी?

डाँ सुरेंद्र पिसाळ
Monday, 9 September 2019

काय हे भक्त? माझं येणं कसं साजरं करावं?
हेच यांना माहित नाहीये
गेल्या वर्षी प्रत्येक ठिकाणी राजा
म्हणून प्रसिध्दी केली जायची.

मला उत्सवातला गणपती मिरवणुकीत
कानावर हात ठेवलेला दिसला.
कधी एकदा पाण्यात अदृश्य
होतोय असं त्याला वाटत असावं.

मी विचारलं," काय रे गणराजा?
असा का बरं वैतागलेला?
एवढ्या लोकांना आनंद झालाय
पण तू का बरं रडवेला झालाय?

आठ दहा दिवसाचा तर प्रश्न आहे
तुझ्या नावाने चाललेला जयघोष
आनंदाचा उगम आहे. 
तूही त्यात मजा करून घे.

गणरायाने माझ्याकडे तिरक्या आणि
चिडक्या डोळ्याने बघितलं आणि म्हणाला,
"असं का तू बोलतो आहेस की
जसं काही तुला काहीच माहितच नाही?

माझा मुक्काम आठ-दहा दिवसाचा
पण गर्दी टाळण्यासाठी आठवडाभर आधीच
मला आणून झाकून ठेवलेय.

सगळं एकाच ठिकाणी होऊ शकतं
पण छोट्या भागात कित्येक ठिकाणी
माझी प्राणप्रतिष्ठा झालीय...

प्रत्येक ठिकाणी मालक माझ्यावर हक्क दाखवताहेत.
डेकोरेशन, बँडबाजे, सजावट, गोडधोड, मनोरंजन
सारं जोरात चालू आहे...

उसनं आणून, वर्गण्या जमा करून
माझ्या नावाने उधळपट्टी करताहेत
नुसती साधी प्रार्थना मला पुरी आहे पण,
साग्रसंगीत रोमन्टीक गाणीच लोकांची तोंडपाठ आहेत

अरे ऐक, गणपती मंदीर असलं तरी
खर्च करून बुडवायला वेगळी मूर्ती आणताहेत.
स्तोत्रे, आरत्या व्यावसायिक लोक सोडून
कोणालाच बोलता येत नाहीयेत...

काय हे भक्त? माझं येणं कसं साजरं करावं?
हेच यांना माहित नाहीये
गेल्या वर्षी प्रत्येक ठिकाणी राजा
म्हणून प्रसिध्दी केली जायची.

यावर्षी माझी सहस्त्रनावही वापरायला कमी केलं नाहीय
छानशौकी करत, नटून थटून हेच लोक मिरवताहेत
आता बसलेल्या कानठाळ्या कित्येक दिवस
माझ्या डोक्यात वाजत राहणार...

महागाईच्या दिवसात
हौसेपोटी एवढी उधळपट्टी?
रस्त्यात गर्दी,
सांग कुठे देऊ वर्दी?

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News