टेलिकाॅम कंपन्यांची वाटचाल साॅफ्टवेअर कंपनी होण्याकडे.. तुम्ही काय शिकणार

सागर नांगरे
Monday, 2 November 2020

एवढा बदल होत असला तरी भांबावून जायचे कारण नाही. कारण नवीन प्रोग्रॅमिंग लँग्वेज या किचकट नाहीत. नवीन सॉफ्टवेअर डिलिव्हरीची पद्धत काम अधिक सोपे करणारी आहे. फक्त आपल्याला ते शिकावे लागेल.

सर्व काही 5G साठी - भाग २

बाजारात येऊ घातलेले ५जी तंत्रज्ञान म्हणजे नेमके काय, टेलिकाॅम कंपन्यांमध्ये त्यासाठी चढाओढ का सुरू आहे, या कंपन्यांमध्ये साॅफ्टवेअर आणि हार्डवेअरच्या दृष्टीने ५जी मुळे नेमके काय बदल होतील आणि त्याचा आपल्या नोकऱ्या किंवा स्किलसेटवर कसा परिणाम होईल हे आपण यापूर्वीच्या लेखामध्ये समजून घेतले 

- सागर नांगरे

लेखक हे टेक्नाॅलाॅजी ब्लाॅगर आहेत

५जी नेटवर्कमुळे साॅफ्टवेअर डेव्हलपमेंट, नेटवर्क सर्व्हर आणि उपकरणांमध्ये अमुलाग्र बदल झाला. हा बदल सबस्क्राईबर्सला नवीन सेवा अधिक गतीने आणि कमी वेळेत कशारितीने पोचवचता येतील यासाठी झाला. साॅफ्टवेअर बनविण्यासाठी पायथाॅन (Python), पर्ल (Perl) किंवा गो (Go) स्क्रिप्टिंग, प्रोग्रॅमिंग लँग्वेज वापरण्यात येत आहेत.
साॅफ्टवेअर डिलिव्हरीसाठी डेव्हआॅप्सची पद्धत अमलात येत आहे. यामध्ये टेस्टिंग, इंटिग्रेशन आणि सर्व्हिस डिप्लाॅयमेंट हे स्वयंचलित झाले आहे. त्याशिवाय, कन्टेनरायझेशन आणि मायक्रोसर्व्हिसेसमुळे साॅफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये एखादे साॅफ्टवेअर माॅड्यूल आपण पुन्हा वापरू शकतो. त्यामुळे पूर्ण डेव्हलपमेंटसाठीचा वेळ वाचतो. तसेच, काही एरर आल्यास ती जलद गतीने सोडवू शकतो.

नेटवर्क उपकरणांमध्ये डेटा प्रोसेसिंग अतिजलद होण्यासाठी साॅफ्टवेअरचा वापर होत आहे. एनव्हीएमई फॅमिलीमध्ये प्रोटोकाॅल्स आणि काॅम्प्युटेशनल स्टोअरेजसारखी नवीन तंत्र डेटा सर्व्हरमध्ये वापरण्यात येत आहेत. सीपीयूची जागा ग्राफिकल प्रोसेसिंग युनिटने (जीपीयू) घेतली आहे. मोठ्या प्रमाणात असलेला डेटा गतीने प्रोसेस करण्यासाठी हाय परफाॅर्मन्स काॅम्प्युटिंग (एचपीसी) पद्धत वापरात येत आहे. यामध्येही नवीन तंत्र येत आहेत.

या सर्व नवीन तंत्रज्ञानाभोवती स्टार्टअप सुरु झाले आहेत. त्यांना मोठ्या टेलिकॉम नेटवर्क कंपन्या आणि फाॅर्च्यून ५०० कंपन्यांकडून नवनवीन प्रोजेक्ट्स मिळत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे टेलिकॉम कंपन्यांची वाटचाल ही सॉफ्टवेअर कंपनी होण्याकडे होत चालली आहे. एटीअँडटी, व्हेरिझाॅन, एरिक्सन, टी-मोबाईल, टेल्स्ट्रा, टेलिफोनिका, डाॅईशे टेलिकाॅम, चायना टेलिकाॅम अशा अनेक कंपन्या या बदलाची उदाहरणे आहेत.

एवढा बदल होत असला तरी भांबावून जायचे कारण नाही. कारण नवीन प्रोग्रॅमिंग लँग्वेज या किचकट नाहीत. नवीन सॉफ्टवेअर डिलिव्हरीची पद्धत काम अधिक सोपे करणारी आहे. फक्त आपल्याला ते शिकावे लागेल. हे समजून घ्यायचे असेल तर कोणत्याही सॉफ्टवेअर कंपनीच्या वेबसाईट वर जाऊन त्यांचे करिअर्स सेक्शन पडताळून पहा. 
कोणतेही क्षेत्र असले तरी त्यामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाशी निगडित रोजगार आहेत. संगणक क्षेत्रामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आता पासून तयार व्हावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी डिजिटल तंत्र वापरत असाल तर नक्कीच थोडे फार पण चांगले बदल पाहावयास मिळतील.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News