बॉलिवूडच्या पदार्पणातच तेजश्री प्रधानचा इंटिमेट सीन 

सकाळ वृत्तसेवा यिनबझ
Wednesday, 12 February 2020
  • तेजश्री प्रधान या अभिनेत्रीची सध्या सिनेवर्तुळात प्रचंड  चर्चा आहे .
  • ह्या चर्चेमागचे कारण म्हणजे तिच्या बॉलिवूड पदार्पणातच तिने दिलेला किसिंग सीन.
  • अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने अभिनेता शर्मन जोशीबरोबर जबरदस्त असा किसिंग सीन दिल्यामुळे या दोघांचा प्रदर्शित होणार आगामी सिनेमा हा चांगलाच प्रकाशझोतात आला आहे.

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील तसेच अनेक अशा लोकप्रिय अशा मराठी मालिकांमधून आपल्या कामाची वेगळीच चुणूक दाखवणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान हि सध्या चांगलीच चर्चेत आहे.

तेजश्री प्रधान या अभिनेत्रीची सध्या सिनेवर्तुळात प्रचंड  चर्चा आहे . ह्या चर्चेमागचे कारण म्हणजे तिच्या बॉलिवूड पदार्पणातच तिने दिलेला किसिंग सीन. अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने अभिनेता शर्मन जोशीबरोबर जबरदस्त असा किसिंग सीन दिल्यामुळे या दोघांचा प्रदर्शित होणार आगामी सिनेमा हा चांगलाच प्रकाशझोतात आला आहे.

बॉलिवूडचे सतत चर्चेत असणारे असे दिग्दर्शक अग्निदेव चॅटर्जी यांनी दिग्दर्शित केलेला "बबलू बॅचलर" ह्या चित्रपटाचे नुकतेच ट्रेलर प्रदर्शित झाले. त्यामुळे या सिनेमाची चांगलीच चर्चा रंगली आहे. तसेच तेजश्री प्रधानाच्या चाहत्यांच्या मनात या सिनेमाविषयी प्रचंड उत्सुकता लागुन राहिली आहे. येत्या २० मार्चला "बबलू बॅचलर" हा सिनेमा प्रदर्शित होणार असून तेजश्री प्रधानच्या भूमिकेबद्दल सिनेरसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.   

 

 

 

 

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News