वेबसिरीज मध्ये झळकणार किशोरी शहाणे 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 31 December 2019

‘चार्जशीट’ या हिंदी वेबसीरिजमधून किशोरी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या वेबसीरिजचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे. १ जानेवारीला ही वेबसीरिज प्रदर्शित होत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमधील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे किशोरी शहाणे. मराठीमधील अनेक सुपरहिट चित्रपट किशोरी यांच्या नावे आहेत. आता त्या वेबसीरिजकडे वळल्या आहेत. ‘चार्जशीट’ या हिंदी वेबसीरिजमधून किशोरी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

या वेबसीरिजचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे. १ जानेवारीला ही वेबसीरिज प्रदर्शित होत आहे. या वेबसीरिजच्या निमित्ताने नव्या वर्षात त्या एक नवा प्रयोग करत आहेत. पहिल्यांदाच किशोरी ग्रे शेडची भूमिका किशोरी साकारत आहेत.

याबाबत त्या म्हणतात, ‘चार्जशीट’मध्ये मी जी भूमिका साकारत आहे त्याला विविध पैलू आहेत. ही कथा मर्डर मिस्ट्री आहे. गायत्री या महत्त्वाकांक्षी स्त्रीची भूमिका मी या वेबसीरिजमध्ये साकारत आहे.’ 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News