तंत्रशिक्षण परिषद परीक्षेसाठी तयार विद्यापीठ, संस्थांना निर्देशही दिले; न्यायालयात प्रतिज्ञापत्र

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 21 July 2020
  • जीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी सर्व स्वायत्त विद्यापीठांना आणि शिक्षण संस्थांना निर्देश दिले आहेत, अशी माहिती अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली.

मुंबई :-  यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी सर्व स्वायत्त विद्यापीठांना आणि शिक्षण संस्थांना निर्देश दिले आहेत, अशी माहिती अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. राज्य सरकारने परीक्षा घेण्यास विरोध केला आहे; मात्र राज्य सरकारला परीक्षांबाबत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, असा दावा करणारी याचिका पुण्यातील निवृत्त शिक्षक धनजंय कुलकर्णी यांनी ऍड. उदय वारुंजीकर यांच्यामार्फत केली आहे. याचिकेवर परिषदेने आज प्रतिज्ञापत्र दाखल केले.

विद्यार्थ्यांच्या हितासाठी परीक्षा घेणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व काळजी घेऊन परीक्षा घ्यावी, असा निर्णय परिषदेने घेतल्याचे न्यायालयात स्पष्ट करण्यात आले. तसेच या परीक्षा ऑनलाईन, ऑफलाईन किंवा मिश्र पद्धतीने घेण्याची मुभाही देण्यात आली आहे, असेही परिषदेने सांगितले आहे. सर्वसाधारणपणे अंतिम वर्षाला ७,३४,५१६ विद्यार्थी बिगरव्यावसायिक; तर २,८३,९३७ विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमामधील आहेत, अशी माहिती आज देण्यात आली. ३१ जुलै रोजी याचिकेवर सुनावणी होणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News