विद्यापीठाच्या ATKT परीक्षेत तांत्रिक अडचणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 26 September 2020
  • अंतिम वर्षाच्या एटीकेटी परीक्षेला शुक्रवारपासून सुरूवात झाली आहे.
  • परंतु परीक्षेला बसलेल्या विद्यार्थांना आयत्यावेळी लिंकच न मिळाल्याने गोंधळ उडाला.
  • मुंबई विद्यापीठाच्या विविध विभागांतील विद्यार्थी तसेच इतर कॉलेजांतील काही विद्यार्थ्यांनाही आयत्यावेळी लिंक न मिळाल्याने किंवा इतर तांत्रिक कारणामुळे परीक्षेला मुकावे लागले आहे.

मुंबई :- अंतिम वर्षाच्या एटीकेटी परीक्षेला शुक्रवारपासून सुरूवात झाली आहे. परंतु परीक्षेला बसलेल्या विद्यार्थांना आयत्यावेळी लिंकच न मिळाल्याने गोंधळ उडाला. मुंबई विद्यापीठाच्या विविध विभागांतील विद्यार्थी तसेच इतर कॉलेजांतील काही विद्यार्थ्यांनाही आयत्यावेळी लिंक न मिळाल्याने किंवा इतर तांत्रिक कारणामुळे परीक्षेला मुकावे लागले आहे. दरम्यान, या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्यात येईल असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

एटीकेटी परीक्षा शुक्रवारपासून सुरू झाली. परंतू लिंक न मिळाल्याने काही विद्यार्थी परीक्षेला बसू शकले नाहीत. याबाबत सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष करत एजन्सीवर विश्वास दाखवल्यानेच परीक्षेवेळी मोठा गोंधळ उडाल्याचा आरोप प्राध्यापकांकडून करण्यात येत आहे. ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाकडून एका खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. त्यानुसार या कंपनीकडून विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी सराव प्रश्नसंच पाठवणे, विद्यार्थ्यांना हॉलतिकीट पाठवणे, त्यांना परीक्षेसाठी लिंक पाठवणे अशी जबाबदारी होती.

पण, शुक्रवारी सकाळी १० वाजता असलेल्या लाइफ सायन्स, तसेच इतर काही विषयांच्या परीक्षेच्या अनेक विद्यार्थ्यांना दुपारी १२ वाजेपर्यंत लिंकच मिळाली नाही. या संदर्भात परीक्षा विभागाला वारंवार फोन करून विचारणा करून ही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. तसेच ज्यांना लिंक मिळाली त्यांचीच परीक्षा घेण्यात आली असून उर्वरित विद्यार्थ्यांची परीक्षा नंतर घेण्यात येईल, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

कोणतीही यंत्रणा तयार नाही

परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाच्या पातळीवर कोणतीही यंत्रणा तयार नाही. त्यामुळे परीक्षेबाबत शिक्षकांकडून विद्यापीठाला काही सूचना करण्याबरोबरच प्रश्न ही उपस्थित करण्यात आले होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अंतिम वर्षाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका बनवणे, त्याचे नियोजन करणे यासाठी कमी वेळ असल्याने प्राध्यापक दिवसरात्र काम करत आहेत. ऑनलाइन एटीकेटी परीक्षेसाठीही विविध विभागाचे प्रमुख आणि शिक्षक गुरुवारी रात्री दोन वाजेपर्यंत तयारी करत होते. परंतु, ऐन परीक्षेवेळी मोठा गोंधळ उडाला. दरम्यान, कॉलेजस्तरावर पार पडलेल्या काही परीक्षांमध्ये ही गोंधळ उडाला. पण कालांतराने तांत्रिक अडचणी दूर केल्यानंतर त्यांनी परीक्षा घेण्यात आली.

मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या अंतिम वर्ष आणि सत्राच्या एटीकेटीच्या परीक्षा सुरू झाल्या. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, विद्यापीठ शैक्षणिक विभाग आणि दूर आणि मुक्त अध्ययन संस्थेतील विद्यार्थी या परीक्षांना या परीक्षांना बसले होते. चार ही विद्याशाखे अंतर्गत विविध अभ्यासक्रम आणि विषयांच्या बॅकलॉगच्या परीक्षा शुक्रवारी सुरळीत पार पडल्या. काही अपरिहार्य किंवा तांत्रिक कारणास्तव परीक्षेला बसू शकले नसतील अशा विद्यार्थ्यांना पुन्हा संधी दिली जाणार आहे. एटीकेटी आणि नियमित परीक्षांच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाने विद्याशाखानिहाय महाविद्यालयांचे ९४ समूह निर्माण केले आहेत.
- डॉ. विनोद पाटील, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News