अश्रू 

डॉ. संदीप एकनाथ क्षीरसागर, सातारा
Friday, 26 April 2019

धावतऽ जग 

(जग एवढऽ व्यावसायिक होत चाललेल आहे की, 
इथऽ कोणाचाही कोणाला कदर नाही. 
आणि 
कोणाचाही कोणाला आदर नाही. 
म्हणून.... 
या व्यावसायिक जगात... 
आपले अनमोल अश्रू... 
आपल्यालाच पुसावे लागतील 
अन्यथा... 
जग पुसायला आले तर 
त्याच पण मोल मागतील) 

अश्रू म्हणजे... 
एक अनमोल खजिना 

धुळीच्या कणान
डोळ्यात भरतऽ
ते नुसतं पाणी असतऽ.... 

मनाच्या घालमेलानऽ
ओसंडून वाहतऽ 
ते अश्रू असतऽ...
मन.... 

मन रूतलेल असतऽ 
सुख - दुःखाच्या डोहात 

मी उगाचच नाही वाहत 
मी उगाचच नाही वाहत.... 

टचकन डोळ्यात 
दुःखाची जाणिव 
म्हणजे अश्रू... 

सुखांचा आनंदोत्सव 
म्हणजे अश्रू... 

चुकांची पहिली शिक्षा
म्हणजे अश्रू... 

प्रिय व्यक्ती... 
दुरावलेल्याची जाणिव
म्हणजे अश्रू.... 

मनाने स्वतःचेच 
केलेल सांत्वन 
म्हणजे अश्रू.... 

आतुन भरून आल्यावर 
डोळ्यांनी प्रत्यक्षात 
दिलेला दृष्टांत... 

मी उगाचच नाही वाहत 
मी उगाचच नाही वाहत..... 

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News