आयपीएल खेळण्यासाठी संघ यूएईत दाखल होण्यास सुरुवात 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 August 2020
  • जगातील सर्वात मोठी टी-२० लीग म्हणून समजली जाणारी इंडियन प्रीमिअर लीग ही क्रिकेट स्पर्धा यंदा कोरोना महामारीच्या पाश्वभूमीवर पहिल्यांदाच भारताबाहेर दुबईत खेळवली जाणार आहे.
  • दरवर्षी मार्च ते मे दरम्यान होणारी ही टी-२० लीग पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेट चाहते उत्सुक असतात.

दुबई :- जगातील सर्वात मोठी टी-२० लीग म्हणून समजली जाणारी इंडियन प्रीमिअर लीग ही क्रिकेट स्पर्धा यंदा कोरोना महामारीच्या पाश्वभूमीवर पहिल्यांदाच भारताबाहेर दुबईत खेळवली जाणार आहे. दरवर्षी मार्च ते मे दरम्यान होणारी ही टी-२० लीग पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेट चाहते उत्सुक असतात. यावर्षी आयपीएलचे हे १३वे पर्व असून यंदा आयपीएलची  ट्रॉफी कोणत्या संघाच्या नावी होणार हे पाहणं औसुक्याच ठरणार आहे. आयपीएल २०२० ही स्पर्धा भारताबाहेर खेळवली जाणार असली तरी सर्व संघातील खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफ यांना कोरोनाच्या पाश्वभूमीवर अनेक नियमांचे पालन करावे लागणार आहे. सर्व संघाना बीसीसीआयने २० ऑगस्ट नंतरच यूएईत दाखल होण्यास सांगितले होते. 

यूएईत दाखल झाल्यानंतर संघातील सर्व खेळाडूंना तसेच इतर स्टाफ सदस्यांना नियमाप्रमाणे सहा दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. या दरम्यान खेळाडूंनी आपल्या संघासोबत कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यास सक्त मनाई असणार आहे. सहा दिवसांच्या क्वारंटाईन मध्ये सर्व खेळाडूंची तीन वेळा कोरोना चाचणी केली जाईल या तीन ही चाचण्या निगेटीव्ह आल्यावरच खेळाडूंना "बायो बबल" मध्ये प्रवेश दिला जाईल. क्वारंटाईन कालावधी संपल्यावरच खेळाडूंना सराव करण्यास मान्यता दिली जाईल.

सनरायजर्स हैद्राबाद हा संघ सर्वात प्रथम यूएईत दाखल झाला. त्यापाठोपाठ दिल्ली संघाने ही मुंबईहून यूएईत दाखल होण्याकरीता उड्डाण घेतले. कर्णधार धोनी आणि त्याचा चेन्नई सुपरकिंग हा संघ सुद्धा आयपीएल खेळण्याकरीता यूएईकडे रवाना झाला आहे. विराट कोहलीचा बँगलोर संघ देखील आयपीएलच्या १३व्या पर्वात सामील होण्याकरीता रविवारी निघाला. यावेळी बँगलोर संघाने विमानात काढलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला असता संघाचा कर्णधार विराट कोहली मात्र या फोटोत दिसला नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विराट  मुंबईहुन प्रायव्हेट प्लेनने दुबईला रवाना झाला आहे. कोलकाता नाइट रायडर्स, किंग्स इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स हे संघ देखील आयपीएल खेळण्यासाठी यूएईत दाखल झाले आहेत. 

आयपीएल २०२० ही क्रिकेट स्पर्धा यंदा १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर यादरम्यान खेळवली जाणार असून यात ६० सामने खेळवले जाणार आहेत. यंदा आयपीएलच्या ठरलेल्या टुर्नामेंट फॉरमॅटमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News