या कारणामुळे "मन फकिरा" या सिनेमाची टीम उतरली रस्त्यावर 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 March 2020

आपल्या चित्रपटाविषयी माहितीचे फ्लेक्स रस्त्याच्या चौका-चौकात झळकावेत अशी काळजी घेताना ते दिसत आहेत.

मुंबई :सध्या मराठी चित्रपसृष्टीमध्ये वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे हे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे मराठी चित्रपट हा कात टाकताना दिसून येतोय. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी कुलकर्णी हि सध्या अभिनेत्री तथा दिग्दर्शकाचा भूमिकेत आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे.

बहुचर्चित सिनेमा म्हणून नावलौकिक प्राप्त झालेला  " मन फकिरा " हा चित्रपट येत्या ६ मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री मृण्मण्यी देशपांडे ,सायली संजीव आणि अभिनेता सुव्रत जोशी या सर्वांनी चांगलीच कंबर कसली आहे. ह्या चित्रपटाचीविषयी माहिती ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात  पसरावी म्हणून या सर्वांनी अनोख्या अशा पद्धतीने प्रमोशन करायला सुरुवात केली आहे.

आपल्या चित्रपटाविषयी माहितीचे फ्लेक्स रस्त्याच्या चौका-चौकात झळकावेत अशी काळजी घेताना ते दिसत आहेत. तसेच फ्लेक्सवर वेगवेगळ्या आशयाचे संदेश देखील त्यांनी प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहेत. अभिनेत्री मृण्मण्यी देशपांडे ही तर पहील्यांदा दिग्दर्शनाच्या माध्यमातून आपल्या कामाची चुणूक दाखवण्याच्या तयारीत आहे.

त्याचबरोबर तिने मृण्मयी देशपांडे हिने या चित्रपटामध्ये अभिनय देखील केला आहे. त्यामुळे मृणमयी देशपांडे आता प्रेक्षकांच्या मनात अभिनयाबरोबर दिग्दर्शनाची सुद्धा  छाप पडेल का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News