गावसकर म्हणतात, सध्याच्या भारतीय संघापेक्षा तेंव्हाचा संघच भारी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019
  • १९८३चा विजेता संघ सर्वोत्तम
  • आज असतात तेवढे ‘ब्रेक्‍स’ पाणी मिळत नव्हते

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सध्या खेळत असलेला भारतीय संघ सर्वांत समतोल आहे का? एकदिवसीय क्रिकेटमधील भारताचा हा सर्वोत्तम संघ आहे का? क्षेत्ररक्षणाच्या आघाडीवर हा संघ सर्वोत्तम आहे का? या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे अर्थातच हो असणार; पण माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी १९८३ चा विश्‍वविजेता संघ सर्वोत्तम होता, असे म्हटले आहे.

एका वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना गावसकर यांनी हे मत मांडले. आमचा संघ सर्वाधिक तंदुरुस्त होता. आपले म्हणणे पटवून देताना गावसकर यांनी दोन्ही काळातील क्रिकेट परिस्थितींची तुलना केली. आमच्या काळात आज असतात तेवढे ‘ब्रेक्‍स’ मिळत नव्हते.

पुरेसे पाणी मिळत नव्हते. सध्याच्या क्रिकेटमध्ये हे सारखे चालते. ‘डीआरएस’च्या सुविधेमुळे राखीव खेळाडू लगेच पाणी घेऊन येतो, विकेट पडली की राखीव खेळाडू मैदानात आलाच. साधारण पाच ते सात मिनिटांनी खेळाडूंना पाणी मिळते. वेगवान गोलंदाजासाठी सध्या सीमारेषेबाहेर राखीव खेळाडू पाणी घेऊन उभाच असतो. आमच्या वेळेत असे काही होत नव्हते. नियमही कडक होते. त्यामुळेच आमचाच संघ सर्वोत्तम ठरतो.’’

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News