टीचर्स डे स्पेशल: बॉलिवूडचे स्टाईलिश टीचर; पाहा कसे दिसतात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 5 September 2020

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन पासून करीना कपूरपर्यंत अनेक अभिनेत्रिनी प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारी भूमिका केली. अशा वेगवेगळ्या शिक्षिकेच्या भुमीका आपण पाहणार आहोत.

मुंबई : आज 5 सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन त्यांचा जन्मदिवस. संपूर्ण देशामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने चित्रपट सृष्टीतील काही दिग्गज अभिनेत्रीने शिक्षकाची भूमिका अतिशय चोखपणे बजावली, अशा अभिनेत्रींच्या भुमीकेचा आढावा घेणार आहोत. बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन पासून करीना कपूरपर्यंत अनेक अभिनेत्रिनी प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारी भूमिका केली. अशा वेगवेगळ्या शिक्षिकेच्या भुमीका आपण पाहणार आहोत.

2010 साली पाठशाळा चित्रपटात आयशा टाकियाने शिक्षिकेची भूमिका केली होती. एक नटखट आणि हाडाची शिक्षिका म्हणून चाहत्याने पसंती दर्शवली. शिक्षिकेच्या भूमिकेत असताना तिने फुल स्लीव्ह टी-शर्ट, डेनिम्स पेयर घातला होता. त्याचबरोबर गळ्याभोवती स्टार्प गुंडाळला होता. तेव्हापासून शिक्षिकेचा नवीन पेहराव उदयास आला. शिक्षक हा नेहमी हसतमुख असावा अशी प्रेरणा त्यांच्या भूमिकेतून मिळाली. 

सिमी ग्रेवाल हिने एकेकाळचा सुप्रसिद्ध चित्रपट मेरा नाम जोकर मध्ये शिक्षिकेची भुमिका केली होती. पाश्चिमात्य वेशभूषा धारण करूनही भारतीय संस्कृतीचा एक उत्कृष्ट नमुना तिने प्रेक्षकांसमोर सादर केला. त्यामुळे चाहत्यांनी तिच्या भुमिकेला भरभरून प्रतिसाद दिला. 

बॉलिवूडची राणी मुखर्जीने 'हिचकी' चित्रपटामध्ये टीचरचा रोल केला. एका वेगळ्या लुकमध्ये ती दिसली. कुर्ती, जीन्स गळ्यामध्ये लॉकेट आणि कपाळावर टिकली असा एक अद्भुत पेहराव प्रेक्षकांना प्रथमच पाहायला मिळाला. त्यामुळे शिक्षकांचा पेहराव असाही असू शकते? याची नव्याने प्रेक्षकांना जाणीव झाली. 

देसी बॉईज चित्रपटामध्ये चित्रांगदा सिंग यांनी एकदम स्टायलिश कॉलेज प्रोफेसरचा लूक परिधान केला होता. अभिनेत्री चित्रांगदा रोल ब्राइट कॉलेजमध्ये असताना वेस्टन स्टाईल मध्ये राहत होती. त्यामुळे तिने वेस्ट आऊटलूक परिधान केला. टी-शर्ट विथ स्कर्ट किंवा ड्रेसमध्ये वेस्टर्न टीचर दिसू लागली. प्रेक्षकांनी या लूकला डोक्यावर घेतले. 

मै हू ना! चित्रपटांमध्ये सुष्मिता सेन टीचरच्या रोल मध्ये दिसली. हा रोल प्रेक्षकांना खूप आवडला. वेस्टन स्टाईल साडी, हलका मेकअप आणि प्रेमळ बोलीभाषा यामुळे ती चर्चेत होती. अभिनेता शाहरुख खान एक विद्यार्थ्यांच्या भुमिकेत होता. शिक्षण आणि विद्यार्थी यांची केमिस्टी चित्रपटामधून पाहायला मिळाली.

कुर्बान चित्रपटामध्ये अभिनेत्री करिना कपूर महाविद्यालयीन शिक्षिकेची भुमिका केली. साधारण राहणीमान अनेकांचा पंसद आले. डिसेंट कपडे आणि साधारण मेकअप प्रेक्षकांना खुप भावला. चित्रपटात ती सैफ अली खानच्या विरुद्ध बाजूने होती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News