आयुष्यात शिक्षक दिन महत्वाचा !

पियुष भोस्तेकर
Saturday, 5 September 2020
  • गुरु शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीमधील एक महत्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे.
  • जीवनात आई-वडिलांची जागा कुणीही भरू शकत नाही कारण आम्हाला या सुंदर जीवनातील सर्वात पहिले गुरु आमचे आई-वडील असतात.

गुरु शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीमधील एक महत्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे. जीवनात आई -वडिलांची जागा कुणीही भरू शकत नाही कारण आम्हाला या सुंदर जीवनातील सर्वात पहिले गुरु आमचे आई-वडील असतात. भारतात प्राचीन काळापासून  गुरु शिष्य परंपरा असून शिक्षक हे आम्हाला जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात. योग्य दिशेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतात.

दरवर्षी ५ सप्टेंबर या दिवशी शिक्षकदिन साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म-दिवसाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पण यावेळी शिक्षक आणि आम्ही शाळेत दिसण्या ऐवजी फोनवर दिसत आहोत. कारण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आमच्या शाळा बंद आहेत. यामुळे आम्हाला आमच्या शिक्षकांना आणि मित्रांना भेटता येत नाही. पण तरीही शिक्षक आम्हाला ऑनलाईन अभ्यास शिकवतात. आणि सलाम बॉम्बे फॉउंडेशनचे सर- मॅडम आम्हाला ऑनलाईन शिक्षण देतात. त्यात आम्हाला फोटोग्राफी आणि इतर काही शिकवतात. आणि ते आम्हाला खूप छान शिकवतात. पण जी शाळेत शिकण्याची मजा आहे ती फोनवर नाही म्हणून मी देवाकडे एकच इच्छा मागतो की, हा कोरोना विषाणू पटकन जाऊ दे आणि आमची शाळा पुन्हा सुरू होऊ दे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News