शिक्षक भर्ती लवकरचं; वर्षा गायकवाड यांचे रयतसंकल्प संघटनेला आश्वासन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 11 March 2020

परमेश्वर इंगोले यांनी आंदोलकांच्या विविध मागण्यासंदर्भात शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन चर्चा केली.

मुंबई: अनेक दिवसापासून रखडलेली शिक्षक भर्ती लवकरचं होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी रयतसंकल्प डी. एड्, बी. एड् संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर इंगोले पाटील यांना दिली. डी. एड्, बी. एड् संघटनेच्या वतिने मुंबई येथील आझाद मैदानावर शिक्षणाकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले होतो. परमेश्वर इंगोले यांनी आंदोलकांच्या विविध मागण्यासंदर्भात शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन चर्चा केली. आंदोलकांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करुन राज्यात लवकरचं शिक्षक भर्ती करण्यात येणार अल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. 

काय आहेत आंदोलकांच्या मागण्या

'महाविकास आघाडी 12 हजार जागांसाठी शिक्षक भर्ती करणार आहेत मात्र, राज्यात आजूनही 15 हजार जागा रिक्त आहेत, त्यामुळे सर्वच जागा एकदाचं भरण्यात याव्यात, मागासवर्गीय कपात धोरण रद्द करावे, माजी सैनिकांसाठीच्या रिक्त जागा, अपात्र उमेदवारांची यांदी जाहीर करावी, शिक्षकांची वेतनवाढ कारावी आदी मांगण्या आंदोलकांनी केल्या आहेत.

राज्यात 10 लाख डी.एड्, बी.एड धारक तरुण बेरोजगार आहेत. मात्र, 12 हजार जागा भरण्यासाठी सरकारला 3 वर्ष लागत आहेत त्यामुळे आमच्या मनात शंका उपस्थित होत आहे. राज्यातील जिल्हापरिषद, खासजी शिक्षण संस्थेत रिक्त असणाऱ्या जागांसाठी तात्काळ भरती करावी अन्यथा रयत संकल्प डी. एड्, बी. एड् संघटना आपल्या पद्धतीने उत्तर देईल अशा इशारा परमेश्वर इंगोले यांनी सरकारला दिला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News