टाटाच्या टीसीएसतर्फे मिळणार ४० हजार लोकांना रोजगार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 13 July 2020

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने मानवी जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक क्षेत्रातील कंपन्यांनी आपल्या कामगारांमध्ये कपात केली.इतकेच नव्हे तर कामगारांच्या वेतनातही कपात केली आहे.

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने मानवी जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक क्षेत्रातील कंपन्यांनी आपल्या कामगारांमध्ये कपात केली.इतकेच नव्हे तर कामगारांच्या वेतनातही कपात केली आहे. त्यामुळे बेरोजगारीची संख्याही वाढली आहे. परंतु असे असतानाच अशा अनेक कंपन्या आहेत जी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देत आहेत. त्यामध्ये टीसीएस कंपनीचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. कोरोनाच्या या संकटातही  या कंपनीने ४० हजार फ्रेशर्सना नोकरी देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेने अनेक बेरोजगारीच्या मनात आशेचा एक नवीन किरण निर्माण झाला आहे. 
 
याचबरोबर टीसीएसने आपल्या अमेरिकेतील कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सुद्धा नोकरीच्या दुप्पट संधी निर्माण करणार असल्याचे सांगितले आहे. रोजगारातील सकारात्मक बाजू लक्षात घेता हळू हळू नोकरीच्या संधी निर्माण केल्या जातील असे कंपनीचे प्रमुख अधिकारी राजेश गोपीनाथ यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या काळात या कंपनीचा नफा 13 % घसरून अवघ्या 7,049 कोटी रुपयांवर आला आहे. 

कोरोना विषाणूच्या वाढत्या संकटामुळे महाविद्यालयातील हायरिंग ८२% कमी झाली तर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिपमध्ये ७४% घट झाली आहे तर ४४ टक्के नोकऱ्यांची जॉइनिंग डेट पुढे ढकलण्यात आल्याचे  firstnoukari.com च्या सर्व्हेक्षणातून समोर आले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News