कोरोनामुळे 'तारक मेहता का उलटा चष्मा'च्या निर्मात्याची अजब मागणी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 17 March 2020

मालिका आणि सिनेमांचे शूटिंग देखील बंद ठेवण्यात आले आहे. अशा परिस्थितीमध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या फेमस मालिकेतील निर्मात्याने एक अजब मागणी केली आहे.

कोरोना व्हायरसचा प्रसार जोमाने वाढत असल्याने सरकारकडून काही विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्यास सांगितले आहे. त्यामध्ये महाविद्यालय, जिम, सिनेमागृहे, मॉल्स, स्विमिंग पूल्स, बंद ठेवण्यात आले आहे. त्यासोबतच मालिका आणि सिनेमांचे शूटिंग देखील बंद ठेवण्यात आले आहे. अशा परिस्थितीमध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या फेमस मालिकेतील निर्मात्याने एक अजब मागणी केली आहे.  

या मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून मर्यादित स्टाफच्या युनिटसह आम्हाला शूटिंगची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. याबाबतचे ट्विट बीएमसीला देखील शेअर करण्यात आले आहे. या ट्विटवर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. 

 

गेल्या काही दिवसांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. भाषेवरून झालेल्या या वादामध्ये मनसेने देखील उडी घेतली होती. आता पुन्हा कोरोना या आजाराचे गांभीर्य नसल्याप्रमाणे त्यांनी हे ट्विट केल्याने पुन्हा एकदा टीका होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

दरम्यान आतापर्यंत राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 40 वर पोहोचला आहे. यामध्ये मुंबईत एका वृद्धाचा मृत्यू देखील झाला आहे. सरकार आणि नागरिक  यापासून बचाव करण्यासाठी आपले प्रयत्न करतांना दिसत आहे. त्यातच या निर्मात्याच्या मागणीमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News