बॉक्स ऑफिसवर 'तान्हाजी'ची घोडदौड सुरु; मोडला भारतातील सर्वात मोठ्या चित्रपटाचा रेकॉर्ड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 February 2020
  • जानेवारी १० ला प्रदर्शित झालेल्या तान्हाजी चित्रपटाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला वेड लावलं आहे. चार आठवडे उलटून गेले तरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे.

जानेवारी १० ला प्रदर्शित झालेल्या तान्हाजी चित्रपटाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला वेड लावलं आहे. चार आठवडे उलटून गेले तरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. तान्हाजी चित्रपटानंतर 'स्ट्रीट डान्सर', 'पंगा', जवानी जानेमान यांसारखे अनेक चित्रपट येऊन गेले. पण या सर्व चित्रपटांना मागे टाकत तान्हाजी चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान कायम ठेवलं आहे.तान्हाजी  चित्रपटाची आतापर्यंतची कमाई पाहता अनेक चित्रपटांचा रेकॉर्ड हा चित्रपट मोडताना दिसत आहे. 

भारतातील सर्वात जास्त बजेट असणारा आणि जास्तीत जास्त कमाई करणारा एकमेव चित्रपट म्हणजे 'बाहुबली-२'. परंतु आता या चित्रपटाचाही रेकॉर्ड तान्हाजी चित्रपटाने मोडल्याचे समोर आले आहे. 'बाहुबली-२' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर २६ व्या दिवशी या चित्रपटाला ०.१३ कोटी इतकी आगाऊ बुकिंग मिळाली होती. परंतु हा विक्रम मोडत  तान्हाजी चित्रपटाला २६ व्या दिवशी ०.१८ कोटी आगाऊ बुकिंग मिळाले आहे. तसेच सलमानच्या 'दबंग'चित्रपटाने मुंबईमध्ये १०४ कोटींची कमाई केली तर 'तान्हाजी'नें १३० कोटींची कमाई केली. म्हणजेच सलमानच्या दबंग चित्रपटाचा रेकॉर्डही या चित्रपटाने मोडला आहे.   'तान्हाजी' चित्रपटाने भारतामध्ये आत्तापर्यंत एकूण २५७ कोटींची कमाई केली आहे.

'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' हा एक ऐतिहासिक चित्रपट असून यामध्ये अजय देवगण याने  नरवीर तान्हाजी मालुसरे यांची मुख्य भूमिका केली आहे. तर  पुढील काही दिवसांत हा चित्रपट ३०० कोटींच्या घरात जाणार यात काही शंका नाही 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News