छपाक करमुक्त, छप्परफाड कमाईत मात्र तान्हाजीच   

सकाळ वृत्तसेवा यिनबझ
Saturday, 11 January 2020
  • दोन्ही चित्रपटांच्या तुलनेत तान्हाजी ने छप्परफ़ाड कमाई केली आहे. विशेष म्हणजे ह्या चित्रपटाला कोणत्याही पद्धतीची सूट दिली नाहीये.
  • तरिसुद्धा छपाक  मात्र तुलनात्मकदृष्ट्या मागे पडताना दिसतोय.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छपाक या चित्रपटावर मनोरंजन कर हा पूर्णपणे माफ केला आहे. छपाक या चित्रपटावरील करमुक्तीचे आदेश उद्धव ठाकरे यांनी नुकतेच जारी केले आहेत.

१० जानेवारीला छपाक ह्या चित्रपटाबरोबर अजय देवगण चा "तान्हाजी द अनसंग वॉरियर" हा चित्रपट प्रदर्शित झाला. या दोन्ही चित्रपटांमध्ये मात्र ओम राऊत यांनी दिग्दर्शन केलेला "तान्हाजी द अनसंग वॉरियर" हा चांगलाच वरचढ ठरतोय.

दोन्ही चित्रपटांच्या तुलनेत तान्हाजी ने छप्परफ़ाड कमाई केली आहे. विशेष म्हणजे ह्या चित्रपटाला कोणत्याही पद्धतीची सूट दिली नाहीये. तरिसुद्धा छपाक  मात्र तुलनात्मकदृष्ट्या मागे पडताना दिसतोय.

त्यामुळे शिवरायांच्या स्वराज्याचा मराठमोळा योद्धा तानाजी मालुसरे ह्यांच्यावर आधारित चित्रपट मात्र सध्या चांगलीच विक्रमी कमाई करताना दिसतोय. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी १५ कोटींचा गल्ला जमववून बॉलीवूडमध्ये चांगलाच धुरळा उडवून दिलाय.      

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News