स्पर्शांची लाडीगोडी

सरिता व्यवहारे, सातारा
Tuesday, 30 April 2019

प्रेमात होतात प्रेमीयुगल वेडी 
विसरुन समाजाची अभेद्य बेडी 
तो तिच्या आणि ती त्याच्या 
श्वासांत करतात 
स्पर्शांची लाडीगोडी ।। 

प्रेमाच्या जाता गावी 
शब्दही होती निनावी 
तो तिच्या आणि ती त्याच्या 
डोळ्यांत स्वप्नं पाहतात भावी ।। 

प्रेमाच्या अनेक वाटा 
तिथं शब्दही पडतो थिटा 
तो तिच्या आणि ती त्याच्या 
मनात करतात आठवणींचा मोहक साठा।। 

प्रेमीक भेटींच्या अनेक जागा 
तेव्हा शब्दही असतात नि:शब्द 
तो तिच्या नि ती त्याच्या 
हातात हात घालून 
जपतात प्रेमाचा नाजूक धागा।। 

प्रेमात होतात प्रेमीयुगल वेडी 
विसरुन समाजाची अभेद्य बेडी 
तो तिच्या आणि ती त्याच्या 
श्वासांत करतात 
स्पर्शांची लाडीगोडी ।। 

प्रेमाचे कळते जेव्हा खरे रुप 
नि:शब्द भावनांनी घेतला जातो 
ऐकमेंकांचा निरोप 
तो तिच्या आणि ती त्याच्या 
पाठमोऱ्या आकृतीकडे 
पाहतच करतात 
अश्रुंनी प्रेमाचा समारोप ।। 

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News