अखेर तमिळनाडू क्रिकेट लीग रद्द

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 1 August 2020
  • गतवर्षी वेगवेगळ्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात राहिलेली तमिळनाडू प्रीमियर लीग यंदा कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर रद्द करण्यात आली आहे.

चेन्नई :- गतवर्षी वेगवेगळ्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात राहिलेली तमिळनाडू प्रीमियर लीग यंदा कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ही लीग १० जून ते १२ जुलै दरम्यान होणार होती; परंतु त्याच वेळी कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे लीग लांबणीवर टाकण्यात आली होती. ऑगस्ट-सप्टेंबरचा कालावधी त्यांनी अपेक्षित धरला होता, परंतु सप्टेंबरपासून आयपीएल सुरू होणार आहे. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटला प्रारंभ होईल. त्यामुळे तमिळनाडू लीग रद्द करणे योग्य ठरेल, असा निर्णय तमिळनाडू क्रिकेट संघटनेने घेतला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News