लव्ह जिहाद रोखण्यासाठी 'हे' उपाय करा:  मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना आदेश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 30 August 2020

'दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्या कमी करण्यासाठी पोलिसांनी ठोस कार्यावाही करावी. मुलींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात आडकवून, ब्लॉकमेलींग केले जात आहे. राज्यात मुलींना फूस लावून तिचे धर्मांतर करण्याचे प्रमाणही वाढले आहे,

लखनौ : मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे धर्मांतर केल्याच्या घटना राज्यात दिवसेंदिवस घडत आहेत, या घटना थांबवण्यासाठी गृहविभागाने तात्काळ आराखडा तयार करावा आणि लव्ह जिहादच्या घटना थांबवाव्या असा आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश गृह विभागाला दिला. 

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची गृह विभागासोबत बैठक संपन्न झाली. यावेळी महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांचा आढावा मुंख्यमत्र्यांनी घेतला. 'दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्या कमी करण्यासाठी पोलिसांनी ठोस कार्यावाही करावी. मुलींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात आडकवून, ब्लॉकमेलींग केले जात आहे. राज्यात मुलींना फूस लावून तिचे धर्मांतर करण्याचे प्रमाणही वाढले आहे, लव्ह जिहादच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी तात्काळा आराखडा तयार करुन कार्यावाही करावी' असा आदेश योगी यांनी पोलिसांना दिला. 

देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला. सरकारने अनेक उपाय योजना करुन देखील कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. 'राज्यात कोरोनाची गंभीर परिस्थितीत निर्माण झाली आहे. ही परिस्थिती गाभीर्यांने हाताळण्याऐवजी सरकार लव्ह जिहाद प्रकरणाकडे नागरिकांचे लक्ष केंद्रीत करत आहे' असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. मात्र योगी सरकारकडून यावर आद्याप कोणतेही प्रतिउत्तर आले नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News