आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी 'हे' उपाय करा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 17 September 2019
  • चरबी तसेच ‘ओमेगा ३’ नावाचे द्रव असते. त्यामुळे हृदयाचे कार्य सुरळीत राहते.

दररोजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेकजणांचे सकस आहाराकडे दुर्लक्ष होते. कामाच्या व्यापात फास्ट फूडला प्राधान्य दिले जाते. त्यातून आरोग्याच्या तक्रारींना आमंत्रण मिळते. मात्र, निरामय आरोग्यासाठी सकस, संतुलित आहाराला अतिशय महत्त्व आहे.

आपल्या शरीराला विविध जीवनसत्त्वांची गरज असते. आपण जीवनसत्त्वयुक्त आहार घेत आहोत, याची काळजी घ्या. नियमित जीवनसत्त्वाचा पुरवठा झाल्याने शरीराचे अनेक आजारांपासून रक्षण होते. त्याचप्रमाणे कर्करोगासारख्या गंभीर आजारापासूनही रक्षण मिळते.शरीराची दैनंदिन ‘ड’ जीवनसत्त्वाची गरज भागविण्यासाठी दररोज सकाळी कपभर दूध घ्या. त्याचप्रमाणे, चहा व कॉफीतील दुधामुळे आपल्या शरीराला २५ टक्के ‘ड’ जीवनसत्त्व मिळते.

तुम्हाला वजन कमी करायचे असल्यास जेवणाआधी एक तास एक ग्लास पाणी प्या. यामुळे शरीराला पुरेसे पाणी मिळते व पाण्यामुळे तुम्ही थोडे कमी खाता. पाणी प्यायल्याने भूक कमी होते व अन्न कमी घेतल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते.अनेकांना पिझ्झा आवडतो. मात्र तो खायचा असल्यास नेहमी टोमॅटो सॉस अधिक घ्यावा. चीजचे प्रमाण कमी असावे.

पिझ्झ्याबरोबरच बर्गर, चिप्स, चिवडा आदी पदार्थ चरबीयुक्त असतात. त्यामुळे, भरपूर पाणी पिऊन त्यातील अतिरिक्त क्षार दूर करावेत.मांसाहारी व्यक्तींनी आठवड्यातून एकदा मासे खावेत. त्यात चरबी तसेच ‘ओमेगा ३’ नावाचे द्रव असते. त्यामुळे हृदयाचे कार्य सुरळीत राहते. नियमित मासे खाणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण खूप कमी आढळते.तुम्हाला मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखा एखादा आजार असल्यास आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आहार घ्यावा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News