पावसाळ्यातील प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे उपाय करा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 6 September 2019
  • रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी लसूण, लवंग, आले, ओट्स, जिरे, हळद आदी पदार्थ आहारात असावेत.

पावसाळ्यातील दमट, ढगाळ हवामान विविध आजारांसाठी अनुकूल असते. विशेषत: प्रतिकारशक्ती कमी होत असल्यामुळे आजारांची शक्यता अधिक असते. लहान मुले, रूग्ण, ज्येष्ठ नागरिक यांची प्रतिकारशक्ती मुळातच कमी असल्यामुळे त्यांनी काळजी घ्यावी. सर्वांनीच  प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपाय योजावेत.
     
पावसाळ्यात सामान्यत: पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे शरीराची गरज भागण्यासाठी पुरेसे पाणी प्यावे. दिवसभरातून किमान आठ-दहा ग्लास पाणी प्यावे.  नेहमीच्या चहा-कॉफीबरोबरच ग्रीन टी, ब्लॅक टीचेही सेवन करावे.
     

दररोजच्या आहारात ताज्या, स्वच्छ धुतलेल्या भाज्या आणि फळांचा समावेश करावा. रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी लसूण, लवंग, आले, ओट्स, जिरे, हळद आदी पदार्थ आहारात असावेत.
     
पावसाळ्यात सूर्यप्रकाश असेल तेव्हा आवर्जून मोकळ्या हवेत फिरायला जावे. त्यातून, प्रतिकारशक्ती तर वाढेलच शिवाय सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात ‘ड’ जीवनसत्त्वही असते.
     
धूम्रपान आणि मद्यपानासारखे व्यसन कमी करावे किंवा ते पूर्णपणे सोडल्यास उत्तमच.   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News