पारगावच्या ज्येष्ठांचा आदर्श

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 26 December 2019

थंडीचे दिवस हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असतात. त्यामुळे थंडी सुरू झाली, की अनेक जण व्यायामाला सुरुवात करतात. पहाटे चालायला जातात. थंडी संपली की मात्र हा दिनक्रम खंडित होतो. मात्र, आंबेगाव तालुक्‍यातील पारगाव येथील वयाच्या पन्नाशी ते सत्तरी गाठलेल्यांनी चौघांनी गेल्या २० वर्षांपासून पाऊस असो की कडाक्‍याची थंडी, दररोज न चुकता भल्या पहाटे नदीच्या पाण्यात एक तास पोहून शरीराला तंदुरुस्त ठेवले आहे. या सर्वांचा दिनक्रम तरुणांसाठी आदर्श आहे.

आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील घोड नदीच्या काठावर वसलेल्या पारगाव येथील माळीमळ्यातील शेतकरी कुटुंबातील जिल्हा दूध संघाचे संचालक दौलत सखाराम लोखंडे (वय ६७), दत्तात्रेय चिमाजी लोखंडे (वय ७०), संभाजी म्हातारबा लोखंडे (वय ५२), शिवाजी सखाराम लोखंडे (वय ५६) यांचा गेल्या २० वर्षांपासून एक दिनक्रम सुरू आहे. ते भल्या पहाटेच दोन ते तीन किलोमीटर चालण्याचा व्यायाम करतात. त्यानंतर घोड नदीच्या पाण्यात एक तास पोहतात. 

थंडी असो की पाऊस, या दिनक्रमात त्यांनी कधी खंड पडू दिला नाही. 
त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन श्रीकांत जयराम लोखंडे, निवृत्ती शंकर लोखंडे, विजय दत्तात्रेय लोखंडे व सचिन बाळासाहेब लोखंडे हे तरुणही त्यांच्यासोबत पोहण्यास जातात. या सर्वांमध्ये पोहण्याच्या स्पर्धाही लागतात. त्या वेळी हे सर्व ज्येष्ठ आपल्या वयाचे भानही विसरून जातात. त्यांचा उत्साह आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News