लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहताना 'या' गोष्टींची काळजी घ्या 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 9 May 2019

आज लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणं अगदीच कॉमन झालं आहे. लग्नाआधी जोडीदाराचा स्वभाव कळला आयुष्यातील गोष्टी सोप्या होतात.

आज लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणं अगदीच कॉमन झालं आहे. लग्नाआधी जोडीदाराचा स्वभाव कळला आयुष्यातील गोष्टी सोप्या होतात. लिव्ह इनमध्ये राहताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. त्यामुळे लिव्ह-इनमध्ये जाण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेऊ.. 

 • लिव्ह-इनमध्ये जाण्यापूर्वी आपल्या जोडीदाराच्या स्वभावाची पूर्ण माहिती जाणून घ्या. सुरुवातीला त्यांच्याशी मैत्री करा.मैत्रीच्या नात्याला पूर्ण करा, वेळ द्या आणि मग निर्णय घ्या. 
   
 • प्रत्येक नात्यात ताण-तणाव तर येतातच. यामुळे नातं आणखी घट्ट होत असते. अनेकदा रागात व्यक्ती मर्यादा ओलांडून बोलते. मात्र त्या गोष्टी तुमच्या जोडीदाराच्या मनाला लागतात. त्यामुळे सोबत राहताना एकमेकांच्या मनाची काळजी घ्या. 
   
 • आज प्रत्येक ठिकाणी महागाईने कळस गाठला आहे. सोबत राहताना येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा खर्च हा वाटून घ्यावा. एकट्यावर खर्च पडल्याने ताण निर्माण होऊ शकतो. त्यामुळे एकत्र राहताना लहान लहान गोष्टीतील खर्च वाटून घेणं गरजेचं आहे. 
   
 • अशा रिलेशनमध्ये राहण्यासाठी मानसिक तयारी असणं गरजेचं आहे. आपल्या जोडीदाराला काय आवडेल काय नाही यावर विचार करणे गरजेचे आहे. कितीही गोष्टी खटकल्या तरी समजून घेणे फायदेशीर ठरेल. 
   
 • सोबत राहताना अनेक भावनांवर ताबा ठेवणे गरजेचे आहे. आपल्याला अपेक्षित जोडीदार नसल्यास किंवा कल्पनेपेक्षा गोष्टी पलीकडे जात असतील, तर दुसऱ्या लाईफसाठी तयार राहावे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News