अस्थमा आजाराची अशी घ्या काळजी

फिरस्ती
Tuesday, 7 May 2019

हल्ली दररोज श्वासावाटे लाखो अदृश्य कण आपल्या संपर्कात येत असतात. काहींना याची अ‍ॅलर्जी होत असल्याने त्यांच्या श्वासनलिका अरुंद होऊन श्वसनास अडथळा येतो. तसेच धुळीचे कण, धूर, फुलांचे परागकण, थंड हवामान, पित्त, मानसिक ताण, व्यायाम, धूम्रपान अशा गोष्टी अस्थमा बळावण्यास कारणीभूत ठरतात.

दरवर्षी मे महिन्यातील पहिला मंगळवार हा जागतिक अस्थमा दिवस म्हणून पाळला जातो. वाढलेली वाहनसंख्या व त्यामुळे होणारे वायू प्रदूषण, धूळ, धूर यामुळे अस्थमाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 

हल्ली दररोज श्वासावाटे लाखो अदृश्य कण आपल्या संपर्कात येत असतात. काहींना याची अ‍ॅलर्जी होत असल्याने त्यांच्या श्वासनलिका अरुंद होऊन श्वसनास अडथळा येतो. तसेच धुळीचे कण, धूर, फुलांचे परागकण, थंड हवामान, पित्त, मानसिक ताण, व्यायाम, धूम्रपान अशा गोष्टी अस्थमा बळावण्यास कारणीभूत ठरतात. या आजाराकडे पूर्ण लक्ष दिले, तर त्यावर नियंत्रण मिळविता येते आणि रुग्ण सामान्य जीवन जगू शकतो.

 इन्हेलर थेरपी:

इन्हेलर म्हणजे तोंडावाटे औषध ओढण्याचे उपकरण. इन्हेलरच्या माध्यमातून औषधे घेतल्यामुळे ते थेट फुफ्फुसांपर्यंत पोहोचतात. याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही व ते अधिक सुरक्षित असते. 

अस्थमाची लक्षणे:

▪ श्वास घेण्यास त्रास होणे.
▪ छातीत तणाव निर्माण होणे.
▪ श्वास घेतांना घाबरल्यासारखं होणे.
▪ श्वास घेताना घाम सुटणे.
▪ अस्वस्थता जाणवणे.

  गोष्टींची घ्या काळजी: 

▪ नेहमी सोबत इनहेलर ठेवा.
▪ घर नेहमी स्वच्छ ठेवा.
▪ धूळ-मातीपासून दू रहा.
▪ व्यायाम आणि योगासने करुन शांत व्हा.
▪ तोंडाने श्वास घेऊ नये.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News