टी-20 विश्वकरंडक 'या' काळात खेळवला जाईल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 22 July 2020

ऑस्ट्रेलियातील विश्वकरंडक ट्‌वेन्टी- स्पर्धा लांबणीवर टाकण्याच्या आयसीसीच्या निर्णयाचे दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने स्वागत करत आहे, असे क्रिकेट दक्षिण आफ्रिका (सीएसए ) चे मुख्य कार्यकारी डॉ. जॅक्‍स फॉल यांनी सांगितले.

केपटाऊन : ऑस्ट्रेलियातील विश्वकरंडक ट्‌वेन्टी- स्पर्धा लांबणीवर टाकण्याच्या आयसीसीच्या निर्णयाचे दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने स्वागत करत आहे, असे क्रिकेट दक्षिण आफ्रिका (सीएसए ) चे मुख्य कार्यकारी डॉ. जॅक्‍स फॉल यांनी सांगितले. आता पुरुष आणि महिलांच्या संघाचे दौरे केव्हा असणार आहेत, ते पाहून आम्हाला चांगली तयारी करता येईल, असे ही ते म्हणाले. 18 ऑक्‍टोबर ते 15 नोव्हेंबरदरम्यान ऑस्ट्रेलियात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते;

परंतु कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता ऑस्ट्रेलियन सरकारने 30 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण देश लॉकडाऊन केला आहे. दरम्यान 2021 मध्ये होणारा टी-20 विश्वकरंडक हा ऑक्‍टोबर-नोव्हेंबर या काळात खेळवला जाईल, असेही आयसीसीने जाहीर केले आहे. सोबतच आयसीसी महिला विश्वकरंडक 2021 मध्ये नियोजित वेळापत्रकानुसार न्यूझीलंडमध्ये होईल. तसेच 2021, 2022 आणि 2023 या तीन वर्षात दोन टी-20 आणि एकएकदिवसीय विश्वकरंडक होणार आहे. 2022 चा टी-20 विश्वकरंडक ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये होईल. याचा अंतिम सामना 13 नोव्हेंबर रोजी होण्याची शक्‍यता आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News