अशी आहेत हायपर थायरॉइडची लक्षणे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 2 July 2019

गेल्या भागात आपण थायरॉइडच्या त्रासाबद्दल जाणून घेतले. या भागात हायपर थायरॉइडची लक्षणे जाणून घेणार आहोत. 

गेल्या भागात आपण थायरॉइडच्या त्रासाबद्दल जाणून घेतले. या भागात हायपर थायरॉइडची लक्षणे जाणून घेणार आहोत. 

 • -धडधड जास्त प्रमाणात होणे 
 • -चिडचिडेपणा, अस्वस्थपणा
 • -स्नायू कमकुवत होणे. थरथरणे.
 • -अनियमित अथवा कमी प्रमाणात मासिक पाळी स्राव होणे. 
 • -वजन कमी होणे
 • -झोप नीट न लागणे.
 • -थायरॉइड ग्रंथीची वाढ दिसणे.
 • -दृष्टिदोष किंवा डोळ्यांची जळजळ होणे
 • -उष्णता सहन न होणे. 
 • थायरॉइडबद्दल महत्त्वाचे

  • -थायरॉइडमुळे इतर आजारांनाही निमंत्रण मिळते. त्यामुळे उपचार महत्त्वाचे.
  • -थायरॉइडचा परिणाम आपल्या हाडांवर होतो, म्हणून कॅल्शिअम व इतर व्हिटॅमिन्सचा आधार आवश्‍यक आहे. 
  • -थायरॉइडचे असंतुलन मासिक पाळीचा तोल बिघडवू शकते. म्हणून मासिक पाळीच्या तक्रारीवेळी या हार्मोन्सची तपासणी अत्यावश्‍यक आहे. 
  •  
  • ​थायरॉइडच्या असंतुलनामुळे आपल्या कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणात वाढ होऊ शकते. म्हणून याच्या आजारामध्ये याचे प्रमाण तपासणे गरजेचे आहे. तरुणपणापासूनच हा विकार घडल्यास मासिक पाळीची अनियमितता आणि प्रजननक्षमता कमी होण्याची शक्‍यता असते. ३० वर्षे वयानंतरच्या स्त्रियांमध्ये त्याचे जास्त प्रमाण आढळते. हायपर थायरॉइडमध्ये पेशंटला उन्हाळ्यात खूप जास्त गरम होते आणि त्यांची चयापचयाची क्षमता वाढून त्यांना खूप घाम येतो, तर हायपोथायरॉइडच्या पेशंटला हिवाळ्यात खूप जास्त थंडी वाजते आणि त्यांचे जेवणही कमी होते. 
  • -वेगवेगळ्या शारीरिक स्थितीमध्ये हार्मोन्सचे प्रमाण वेगवेगळ्या पातळीप्रमाणे ठेवणे उचित असते.
  • -गरोदर स्त्रीच्या हार्मोन्सची पातळी होणाऱ्या बाळाच्या मेंदूच्या वाढीबरोबर संलग्न असू शकते. कारण पोटातील बाळाची ही ग्रंथी पूर्णपणे विकसित नसल्याने त्यांच्या हार्मोन्सची गरज फक्त आईच्या हार्मोन्समधून पुरवली जाते. 
  • -या आजाराचे सरळ उत्तर नसेल तरी आयोडीनयुक्त पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, लसूण, तीळ, मशरूम या गोष्टींचा वापर दैनंदिन जीवनात केल्यास आपण बऱ्याच प्रमाणात औषधांबरोबरीने याचे नियंत्रण करू शकतो.  
  • -थोडीशी काळजी आणि नियमित तपासणी हे दोन उपाय या सर्व त्रासापासून मुक्त करू शकतात. 
  • -प्रत्येक वर्षी थायरॉइडची तपासणी उपयुक्त ठरू शकते. 
  • -कोणत्या चाचण्या कराव्या आणि किती वेळा कराव्यात, याचा सल्ला डॉक्‍टरांकडून घेणे जास्त योग्य आहे.
    

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News