वायरल इन्फेक्शनची घरोघरी वर्दी 

विवेक मेतकर
Friday, 19 July 2019
 • वातावरणीय बदलांचा परिणाम : सर्दी, खोकला, तापांच्या रुग्णात वाढ
 • शिवाय सर्वोपचार रुग्णालयाच्या ओपीडीतही वाढ
 • डेंग्यू, चिकुनगुनिया या आजाराची लक्षणे

अकोला : जिल्ह्यात डेंग्यू, चिकुनगुनिया सदृश तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून, अनेक रुग्णांमध्ये डोकेदुखी, हातापायात दुखण्याच्या समस्या दिसून येत आहेत. साथरोग सदृश आजार अकोलेकरांसाठी तापदायक ठरत असून, जिल्हाभरातील दवाखाने, रुग्णालये हाऊसफुल्ल झाले आहेत. परिणामी घरोघरी वायरल इन्फेक्शची वर्दी लागत असल्याचे मेडिकल कॉलेजच्या औषध वैद्यक शास्राचे विभागप्रमुख डॉ.मुकुंद अष्टपुत्रे यांनी सांगितले. वातावरण बदलामुळे नागरिकांमध्ये आरोग्यविषयक समस्या जाणवू लागल्याने जिल्हाभरातील दवाखाने, रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढली आहे. शिवाय सर्वोपचार रुग्णालयाच्या ओपीडीतही वाढ झाल्याचे डॉ.अष्टपुत्रे यांनी सांगितले. यातील बहुतांश रुग्णांमध्ये साथरोग सदृश आजारांची लक्षणे दिसून येत आहेत. विशेषत: डेंग्यू, चिकुनगुनिया या आजाराची लक्षणे दिसून येताच तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. 

स्वाइन फ्लूपासून राहा सावध! 
वातावरणातील बदलामुळे स्वाइन फ्लूचाही धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वाइन फ्लूपासून सावध राहण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. ताप, डोकेदुखी, अंगदुखी, अशक्तपणा, छातीत दुखणे, घशात खवखवणे, सर्दी आदी स्वाइन फ्लूची लक्षणे आहेत.

डेंग्यू, चिकुनगुनियाची लक्षणे खालील प्रमाणे :

 • अचानक थंडी वाजून ताप येणे.
 • डोकेदुखी, शरीर बधिर होणे. 
 • पाठ दुखीचा त्रास होणे.
 • भूक मंदावणे, जेवणाची इच्छा न होणे. 
 • शरीर वाकल्यासारखे होणे.

 

आजार टाळण्यासाठी ह्या गोष्टी करा.

 • घर व परिसरात स्वच्छता पाळा. 
 • छतावर किंवा इतर ठिकाणी पाणी साठवणे टाळा 
 • शिळे अन्न खाण्यास टाळा.
 • पाणी उकळून प्यावे.
 • उघड्यावरील पदार्थांचे सेवन टाळा. 
 • मॉस्किटो मॅट किंवा मच्छरदाणीचा उपयोग करा. 

 
रुग्णांमध्ये साथीच्या आजारांची लक्षणे दिसून येत आहेत. मात्र, यातील काही लक्षणे वातावरणातील बदलांचाही परिणाम असू शकतो. असे असले, तरी नागरिकांनी याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार करावा. आजारांपासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. 
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला. 

वायरल इन्फेक्शनचा परिणाम सध्या रुग्णांवर जाणवू लागला आहे. सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे. विविध आजाराचे दररोज ५०० च्या सुमारास रुग्ण उपचार घेण्यासाठी येत आहे. 
-डॉ.मुकुंद अष्ठपुत्रे, विभागप्रमुख, औषध वैद्यकशास्र, जीएमसी    
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News