दुभंगलेल्या नात्याला सखी सेलचा आधार

जालींदर धांडे, बीड
Friday, 19 April 2019

-पती पत्नी मध्ये सोशल मीडिया ठरतोय अडसर, ८० टक्के वाद सोशल मीडियामुळेच.
-जानेवारी २०१९ पासुन आता पर्यंत सखी सेल ने ९५ तुटलेले संसार जुळविले.

बीड - प्रत्येक घरात ज्या प्रकारे भांड्याला भांडे लागतात. तसेच संसाराचा गाडा चालवताना सुद्धा नवरा बायकोचे भांडणे होतातच. परंतु सध्या धावपळीच्या जीवनात एकमेकांना जास्त वेळा देता येत नसल्यामुळे दोघात अनेक गैरसमज निर्माण होत आहेत. यातुनच पती पत्नीतील वाद शेवट्या टोकाला जात आहेत.

परंतु हेच आत मिटुन परत पती पत्नींना एकत्र आण्याचे काम पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी सुरु केलेल्या सखी सेल च्या माध्यमातुन होत आहे. जानेवारी २०१९ पासुन आता पर्यंत जिल्ह्यातील ९५ दुभागलेल्या जोडप्यांना एकत्र आण्याचे काम सखी सेल ने केले आहे. 

जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासुन पती पत्नीचा वादात मोठ्या प्रमाणात वाढत होताना दिसत आहे. पती पत्नीतील विविध वादामुळे दोघेही वेगळे होण्याचा निर्णय घेतात. वादामध्ये प्रमुख कारणे म्हणजे दोघेही एकमेकांना जास्त वेळ देत नाहीत, पतीचे दारु मद्यपान करणे, दारुच्या नशेत पत्नीस मारहाण करणे, पैशासाठी पत्नीचा छळ करणे, छोट्या छोट्या गोष्टीमुळे पत्नीचे सारखे भांडण करणे तसेच सध्या पती पत्नीच्या वादात सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात फरक पडला आहे.

यासह विविध कारणांनी पती पत्नींत होणारे वाद यामुळे दोघांनी विभक्त होण्याचा घेतलेला. परंतु या दोघांच्या निर्णयामुळे त्यांच्या लेकरांवर होणार वाईट परिणाम रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात सखी सेल विभाग सुरु करण्यात आलेला आहे. याठिकाणी पती पत्नीमध्ये समजोता घडुन आण्याचा पर्यंत करण्यात येत आहे.

पोलिस अधीक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार भरत माने, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अनिल पुराणिक, मनिषा लकडे, निर्मला मतकर, रेखा गोरे, अनिता खरमाडे, दीपाली सावंत, कल्पना चव्हाण आदीं हे काम करत आहेत. 

चार महिन्यात सखी सेल मध्ये एकुण १९८ अर्ज दाखल
जानेवारी २०१९ पासुन आता पर्यंत पोलिस अधीक्षक कार्यालयातील एुकण १९८ अर्ज आलेले आहेत. यातील ९५ प्रकरणात समजोत करण्यात आलेला आहेत. तर २५ प्रकरणात संबंधित पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे नोंद केलेले आहेत. यासह अजुन ८७ प्रकरणात समुपदेश करण्याचे काम सुरु आहे. तसेच २०१८ मध्ये सुद्धा सखी सेलच्या वतिने ४८८ संसार परत जोडण्यात आले होते.

८० टक्के वाद हे सोशल मिडियामुळेच
मोबाईलमुळे जेवढे चांगले फायदा होतात, त्याच्या दुप्पट तोटे सुद्धा होत असतात. फक्त आपणच निर्णय घ्यायची की, याचा चांगला वापर करायचा की वाईट. सध्या जिल्ह्यात पती पत्नी मध्ये होणाऱ्या वादात ८० टक्के वाद हे सोशल मिडियावरील चॅटिंगच्या संशयमुळे होत असल्याचे उघड झाले आहे. यामुळे पती पत्नींनी एकमेकांना वेळ देऊन गैरसमज न करता. विश्वास संपादन करण्याची गरज आहे. 

प्रतिक्रीया
सध्याच्या धावपळीत पती पत्नी एकमेकांना जास्त वेळ देऊ शकत नाहीत. यामुळे दोघात सुद्धा मोठ्या प्रमाणात गैरसमज निर्माण होतात. गेल्या तीन चार वर्षापासुन या वादात मोठ्या प्रमाणात वाढ  झाली आहे. परंतु पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनासाठी आम्ही या जोडप्यांना परत एकत्र आण्यासाठी, त्यांच्यात समजोत घडुन आण्याचे काम करत आहोत. याकामी सखी सेल मधील सर्व टिमचे योगदान महत्वाचे आहे. (सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, अनिल पुराणिक सखी सेल, बीड) 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News