"स्वराज्यरक्षक संभाजी" मालिका बंद होणार? असा होणार शेवट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 February 2020
  • या मालिकेचं शूटिंग अंतिम टप्प्यात आलं आहे.
  • फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे

गेल्या तीन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी 'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका शेवटच्या टप्प्यात पोहचली आहे. या मालिकेत छत्रपती संभाजी राजेंचे संपूर्ण रूप दाखविण्यात आले आहे. त्यांचा इतिहास लोकांपर्यन्त कसा पोहचेल यासाठी नेहमीच ही मालिका अग्रेसर ठरली आहे.

अमोल कोल्हे हे छत्रपती संभाजी राजेंच्या भूमिकेत असून त्यांची हुबेहूब छाप पाडली होती. मात्र ही मालिका आता बंद होणार आहे. मात्र याचा शेवट काय असणार याबाबत प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण होत आहे.

या मालिकेचं शूटिंग अंतिम टप्प्यात आलं आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. या मालिकेचा शेवट अतिशय रंजक असा असणार आहे. यासाठी जोरदार तयारी करण्यात येत असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. झी मराठीवर सुरु झालेल्या या मालिकेचा टीआरपी नेहमीच वरच्या क्रमांकावर राहिला आहे. मालिकेने गेल्याच वर्षी ५०० एपिसोड पूर्ण केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक घडामोडींवर ही मालिका आधारित होती. अमोल कोल्हे यांनी इतिहासाला कोणतंही गालबोट न लागता, प्रेक्षकांसमोर ती हुबेहूब मांडली.

आजच्या तरुणाईला छत्रपती संभाजी महाराजांचा कळावा यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. मात्र आता या मालिकेचा शेवट कसा असणार आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

दरम्यान ही मालिका बंद होणार असून या जागी कोणती मालिका येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News